election-voting

Pune News : पुण्यातील ‘या’ सोसायटीमध्ये देशातील पहिले मतदार केंद्र; पुणे प्रशासनाचा अनोखा उपक्रम

219 0

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यंदा पहिल्यांदाच विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये म्हणजेच सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने काम देखील सुरू झालेले आहे. पुण्यातील एकूण 35 सोसायटीमध्ये परिपूर्ण अशी मतदान केंद्रे उभारली जात आहेत. आणि हा उपक्रम राबवणारे पुणे हे देशातील पहिले शहर बनले आहे.

कुठे, किती मतदान केंद्र ?
पुण्यातील एकूण 35 सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारली जात आहेत. यात खडकवासला भागात सर्वाधिक म्हणजेच 15 केंद्रे असून वडगाव शेरी मध्ये 7, कोथरूडमध्ये 8 आणि भोर मध्ये केवळ 5 सोसायट्यांमध्ये किंवा मतदान केंद्रे असणार आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुण्यात मोठमोठ्या सोसायटी आहेत. छान मध्ये हजारो लोक राहतात. त्यामुळेच या सोसायटीमध्ये पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असतील त्या ठिकाणी एक स्वतंत्र मतदार केंद्र उभारले जात आहे. त्याचबरोबर सामान्य मतदार केंद्रावर ज्या प्रकारे सर्व सुविधा असतात. तशाच सुविधा या सोसायट्यांमध्ये ही देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने वैद्यकीय सेवा, लहान मुलांसाठी पाळणाघर, स्वच्छतागृह अशा विविध सुविधा मतदारांना पुरवल्या जातील. मतदारांचे कोणत्याही प्रकारे हाल होऊ नये किंवा मतदान प्रक्रियादरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे.

मतदार किती ?
पुण्यातील मतदारांची संख्या 82 लाख 92 हजार 951 इतकी असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील 43 लाख 28 हजार 954 पुरुष मतदार तर 39 लाख 63 हजार 269 महिला मतदार आहेत. मतदान करणाऱ्या तृतीयपंथीयांची नोंदणीही चालू असून त्यांची लोकसंख्या 750 च्या वर गेलेली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

MNS : तर “हर हर महादेव “म्हणत हिंदूंनी ही तयार राहील पाहिजे …!

Posted by - September 24, 2022 0
पुणे : पुण्यात एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई करत कोंढवा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांना अटक केली होती.…
Khadakwasala Dam

धक्कादायक ! खडकवासला धरणात 9 मुली बुडाल्या; 7 जणांना वाचवण्यात यश

Posted by - May 15, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune) खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये धरणात सकाळी पोहायला गेलेल्या…

निलेश माझिरे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर रवाना

Posted by - December 15, 2022 0
मुंबई : पुण्यात मनसेच्या गोटातील अंतर्गत राजकारणामुळे अनेक खलबती घडल्या आहेत. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर निलेश माझिरे आता कोणत्या पक्षात…

VIDEO : पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथी महिलांच्या हस्ते आरती… पाहा

Posted by - September 3, 2022 0
पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव मंडपात मंगलमूर्ती तृतीयपंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या तृतीयपंथी महिला सदस्यांनी आरती केली. गणेशोत्सव काळात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *