Pune News

Pune News : शैक्षणिक कर्जमाफीची काँग्रेसने दिलेली गॅरंटी असंख्य पालकांसाठी दिलासाजनक : रवींद्र धंगेकर

286 0

पुणे : काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि 25 हमी दिल्या आहेत, त्यातील शैक्षणिक कर्जमाफीची हमी ही ऐतिहासिक स्वरूपाची आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी अशा स्वरूपाची गॅरंटी देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे आणि त्यातून असंख्य पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे असे प्रतिपादन काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.

यासंदर्भात आज प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की, मार्च 2024 पूर्वी ज्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे ते कर्ज माफ करण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. सध्या महागाईमुळे मध्यमवर्गीय तसेच गरिबांना आपल्या मुलांचा शैक्षणिक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यातच इंजीनियरिंग किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रचंड रकमेची फी पालकांना भरावी लागते. त्यासाठी हजारो पालकांनी शैक्षणिक कर्जाचा मार्ग निवडून पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. या शैक्षणिक कर्जाचे हप्ते, व्याज आणि परतफेड करणे जिकीरीचे बनले आहे, त्यामुळे देशातील विद्यार्थी व पालकांची ही अडचण लक्षात घेऊन काँग्रेसने शैक्षणिक कर्जमाफीची क्रांतिकारी हमी जाहीर केली आहे.

या शैक्षणिक कर्जमाफीचा लाभ पुण्यातल्याही असंख्य विद्यार्थी आणि पालकांना होणार असल्याने त्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत शैक्षणिक कर्जाच्या माफीची गॅरंटी कोणत्याच राजकीय पक्षांनी दिलेली नाही त्यामुळे काँग्रेसची ही गॅरंटी ऐतिहासिकही ठरली आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. त्याखेरीज पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक लाख रुपये मदतीची अप्रेंटिसशिप योजना काँग्रेसने या जाहीरनाम्यात सादर केली आहे. त्याचाही देशभरातील सर्वच पदवी व पदविका धारक युवकांना लाभ होणार आहे. पहिली नोकरी पक्की या नावाने काँग्रेसने दिलेली ही हमी देशात कोणीही बेरोजगार राहणार नाही याचीच गॅरंटी आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. गरीब महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला एक लाख रुपयाची थेट मदत देण्याची काँग्रेसची गॅरंटीही गेम चेंजर आहे असेही या पत्रकात धंगेकर यांनी नमूद केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Pune News : विचार पुण्याचा… दीर्घकालीन हिताचा! भाजपकडून लोकसभेसाठी संकल्पपत्र जाहीर

Ajit Pawar : ‘निवडणूक होऊ द्या! एका एकाला कसा सरळ करतो’ अजित पवारांनी भरसभेत दिला दम

Sharad Pawar : शरद पवारांनी व्यक्त केली ‘ती’ भीती; म्हणाले…

Weather Update : पुढील 24 तास खूप महत्वाचे; हवामान खात्याने दिला ‘हा’ नवीन अलर्ट

Gold Rate : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं महागलं!

Accident News : ट्रकचालकाकडून झाली ‘ती’ चूक अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं

Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

punit balan

Punit Balan : अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवेद्य

Posted by - May 11, 2024 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या…
Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणामध्ये आरोपींविरोधात गुन्हे शाखेनी केली ‘ही’ मोठी कारवाई

Posted by - January 28, 2024 0
पुणे : कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत या…
Rohit Pawar Office

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Posted by - July 16, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात…
Dhule Bus Accident

Pune Accident : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना ! अल्पवयीन मुलीने दिलेल्या धडकेत 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - June 1, 2024 0
पुणे : पुण्यातून अजून एक हिट अँड रनची (Pune Accident) घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात हि घटना घडली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *