Pune News

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

324 0

पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना (Pune News) सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट पाहतात. चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’साठी कोंढव्याच्या कौसर बागेतील शालिमार केटरर्स अविरत सेवा देत आहे. त्यामुळे रमजान महिन्यात दरवर्षी अस्सल खवय्यांची पावले स्वादिष्ट पदार्थांची चव चाखण्यासाठी ‘शालिमार’कडे वळतात. बिगरमुस्लिम समाजातील सर्वच वयोगटातील ग्राहक ‘शालिमार’चा मान आहे.

‘शालिमार’चे प्रमुख नुसरतभाई यांच्या विशेष मेहमाननवाजीमुळे ग्राहक स्टॉल शोधत येतात व मोठ्या चवीने येथील पदार्थ चाखतात. प्रत्येक ग्राहकांची आपुलकीने चौकशी करणे, ‘आधी चव बघा आणि मग खा’ या नुसरतभाईंच्या आपुलकीच्या आग्रहामुळे ग्राहकांना ते आपलेसे करतात. नुसरतभाई यांची मुलगी अर्शिन हॉटेल व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर पदवी घेऊन वडिलांच्या हॉटेल व्यवसायात इनोवेशन करीत नव्या पिढीला आवडणारे खाद्य पदार्थ समाविष्ट करत आहे. तर मुलगा रियाझही या कामात आहे.

अर्शीन शेख म्हणाल्या, “अब्बूजान (नुसरतभाई) यांचा प्रत्येक ग्राहकाशी जोडलेली नाळ आणि येथील ६०-७० मांसाहारी विशेष पदार्थ, जिभेवर विरघळणारे स्वीट खाल्ल्याशिवाय खव्वयांचे समाधान होत नाही. अफगानी लेग, दालचा खाना, कबाब, लखनवी पुलाव, चिकन-मटण बिर्याणी, चिकन सामोसा, चिकन ६५, लॉलीपॉप, मटण तवा, चिकन व मटण हंडी, रुमाली रोटी आदी पदार्थांना ग्राहकांची विशेष पसंती आहे. यातही दालचा खाना आणि गोड पदार्थात शाही तुकडा, फेरणी न खाता खवय्ये माघारी परत येणे अशक्यच आहे.

नुसरतभाई म्हणाले, “गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात आहे. आपुलकी, सर्वधर्म समभाव, सर्वांशी मैत्री आणि जिव्हाळा जपत येणाऱ्या प्रत्येकाची व्यवस्थित मेहमाननवाजी करतो. चांगले काम करताना अडचणी खूप येतात पण मी थांबत नाही. त्यात सर्वधर्मियांची मोठी साथ मिळाली. मुस्लिम बांधव दिवसभराचा कडक उपवास धरल्यानंतर रात्री ७.३० नंतर रोजा सोडण्यासाठी रुचकर, स्वादिष्ट, पौष्टिक आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी शालिमार केटरर्सला भेट देतात. खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेऊन मुस्लिम बांधव रोजा सोडतात. याशिवाय सर्वधर्मीय खवय्ये याठिकाणी मोठी गर्दी करतात. हा स्टॉल दुपारी ४ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू असतो.

व्यवसायाला सामाजिक उपक्रमाची जोड
दरवर्षी या व्यवसायाला नुसरतभाई सामाजिक उपक्रमाची जोड देतात. यंदा तृतीयपंथीयांना सन्मान देण्यासाठी व जागृती करण्यासाठी २०-२५ तृतीयपंथीयांना त्यांनी सन्मानाने स्नेहभोजन दिले आहे. तसेच त्यांच्यातील अनेकांना काउंटरवर सेवेची संधी दिली आहे. त्यांच्यासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावणार असल्याचे नुसरतभाई म्हणाले. यापूर्वी नफ्यातील १० टक्के हिस्सा सामाजिक कार्यावर खर्च केला आहे. भवानी पेठेतील झोपडपट्टी भागात धान्य वाटप, पुलवामा येथील जवांनाना, विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मदत केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Pawar : शरद पवार गटाची दुसरी यादी जाहीर

Murlidhar Mohol : खाद्य संस्कृती जोपासणारे बंट्स बांधव ‘पक्के पुणेकर’ : मुरलीधर मोहोळ

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट; पालिका आयुक्यांनी दिले ‘हे’ आदेश

Vanchit Bahujan Aghadi : वंचित कडून कॉँग्रेसच्या बंडखोराला पाठिंबा; ‘या’ मतदारसंघात वंचितचा मोठा निर्णय

Loksabha : लोकसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले खासदार कोण?

Pune News : क्रेनचा हूक तुटल्याने कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

Vaishali Darekar : चर्चेतील चेहरा : वैशाली दरेकर

Navneet Kaur Rana : अखेर नवनीत राणांना दिलासा; जात प्रमाणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Bharati Pawar : चर्चेतील चेहरा : भारती पवार

Congress : लोकसभेच्या तोंडावर ‘या’ काँग्रेस नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Sanjay Nirupam : निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

Purvottanasana : पूर्वोतानासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

divorce

असाही एक घटस्फोट, पत्नीने सोडला पोटगीचा हक्क आणि….

Posted by - May 8, 2023 0
पुणे : आजकाल घटस्फोट (Divorce) झाला कि पतीला आपल्या पत्नीला पोटगी (Alimony) द्यावी लागते. मात्र कधी पत्नीने घटस्फोटादरम्यान आपल्या पत्नीला…
SSC Result Date

SSC Result Date : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल

Posted by - May 22, 2024 0
पुणे : बरावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला आहे. त्यापाठोपाठ आता लाखो विद्यार्थ्यांना आणि पालकांना दहावीच्या निकालाची (SSC Result…
Pune Police

Pune Crime : पत्रकारांवर पिस्तुलातून गोळी झाडुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद

Posted by - June 22, 2023 0
पुणे : स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा (Pune Crime) रजि.नं 142/ 2023 भा.दं.वि. कलम 307, 341, 506 (2) 34 व आर्म…

#PUNE : छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचा शासकीय सोहळा साजरा होणार !

Posted by - January 20, 2023 0
पुणे : भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्री.मुरलीधर मोहोळ यांच्याकडून शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती शासकीय पातळीवर साजरी…
Supriya Sule

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईचा प्रश्न सोडवा, सुप्रिया सुळे यांची मागणी (व्हिडिओ)

Posted by - May 11, 2022 0
पुणे- केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झाले आहे. तर मग पैसे तुमच्यापाशी कशाला ठेवलेत ? महागाई कमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *