Pune News

Pune News : खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा दुर्दैवी मृत्यू

26413 0

पुणे : रक्षाबंधानाच्या दिवशी पुण्यातील (Pune News) एका कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये कारसह धरणात बुडून एका तरुणीला आपले प्राण गमवावे लागले आहे. बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घडली आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी जात होते. संस्कृती सोमनाथ पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीचं नाव आहे.

काय घडले नेमके?
नांदेड सिटी येथे राहणारे सोमनाथ पवार हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पत्नी अर्चना, मुलगा प्रद्युम्न,मुलगी संस्कृती व बहीण सुनीता नारायण शिंदे यांच्यासह कारने पानशेत या आपल्या मुळ गावी जात होते. कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत माऊलाई मंदिराजवळ अचानक पवार यांच्या कारचे उजव्या बाजूचे टायर फुटल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक तात्काळ मदतीसाठी धावले. इतरांनी शर्थीचे प्रयत्न करत रात्री उशिरा खोल पाण्यात बुडालेली कार शोधून बाहेर काढली. कारमध्ये संस्कृतीचा मृतदेह आढळून आला आहे. ‌याबाबत वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मुळशी व सिंहगड आपत्ती व्यवस्थापन समिती, पीएमआरडीए अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन रात्री उशिरा तिचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. बाकी लोकांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.

Share This News

Related Post

Pune Video

Pune Video : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत ! ग्राहकांच्या डोळ्यादेखत वाईन शॉप लुटले

Posted by - November 21, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune Video) पुन्हा एकदा कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हातात…
Akola News

Akola News : सगळ्यांना वाटलं चिमुकलीचा आकस्मित मृत्यू झाला; मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!

Posted by - September 6, 2023 0
अकोला : अकोला जिल्ह्यातून (Akola News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Akola News) आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा…

सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती यांची सांगड घालत सुशासन नियमावली करावी ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Posted by - September 8, 2022 0
मुंबई : सामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेऊन त्यांना शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ सुलभरित्या मिळावा यासाठी सामान्यांच्या समस्या आणि शासकीय कार्यपद्धती…

मोठी बातमी : कसबा चिंचवड पोटनिवडणूकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड करणार मदत

Posted by - February 10, 2023 0
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून, आज संभाजी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *