Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

282 0

पुणे : दिनांक 04•12•2023 रोजी राञी 09.25 वाजता एक मुलगी एनआयबीएम रस्ता, दोराबजी मॉलसमोर पाण्याच्या टाकीत पडल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळाली. वर्दी मिळताच दलाकडून कोंढवा खुर्द येथील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी केली असता तिथे मोकळ्या परिसरात पाण्याच्या मोठ्या तीन टाक्या बांधल्या असून त्या सद्यस्थितीत रिकाम्या असल्याचे समजले.त्यामधील जवळपास 40 फुट खोल असणाऱ्या मोठ्या टाकीमध्ये वरुन पाहिले असता मुलगी जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले.

अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांनी तातडीने स्वतः व जवान अनिकेत गोगावले यांनी सेफ्टी बेल्ट परिधान करत रश्शीच्या शिडीच्या साह्याने जवळपास 40 फुट खोल टाकीमध्ये प्रवेश केला तर इतर जवान वर थांबून साहित्याची देवाणघेवाण करीत होते. शिंदे यांनी मुलगी जखमी अवस्थेत असल्याचे पाहून नियंत्रण कक्षामार्फत रुग्णावाहिका व डॉक्टर यांची मागणी केली व लगेच मुलीला सेफ्टी बेल्ट लावून दलाकडील जाळीमध्ये वर पाठवण्यास सुरवात केली. टाकीच्या वर असलेल्या जवानांनी मुलीला सुरक्षितरित्या टाकीबाहेर घेत रुग्णवाहिकेत ठेवले. त्याचवेळी उपस्थित डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन देत 108 या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले.

मुलीच्या पायांना व डोक्याला मार लागला असून जखमी अवस्थेत दलाच्या जवानांनी वेळेत तिला बाहेर काढत एकप्रकारे जीवदान देत आपले कर्तव्य बजावले आहे. मुलीचे नाव इनसीया इसाक इडतवाला (वय वर्ष 16) राहणार कोंढवा, बादशाहनगर कोणार्क पुरम येथील रहिवाशी असल्याचे समजले. सदर कामगिरी पुर्ण करण्याचा एक तास अवधी लागला.या कामगिरीत कोंढवा खुर्द अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे, वाहनचालक दिपक कचरे व फायरमन मोहन सणस, रवि बारटक्के, अनिकेत गोगावले, संतोष माने, रामराज बागल यांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

“त्यांनी मला वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला…!” भाजपा महिला पदाधिकाऱ्याचा आरोप; जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल ; आव्हाड आमदारकीचा देणार राजीनामा ?

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना 15000 रुपयांच्या…
Pune News

Pune News : महा. अंनिस पिंपरी चिंचवड शहर शाखा अध्यक्षपदी डॉ.योगेश गाडेकर यांची नियुक्ती

Posted by - January 29, 2024 0
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश गाडेकर, कार्याध्यक्षपदी विकास सूर्यवंशी तर सचिवपदी गणेश…
Pune Rain News

Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस; ‘या’ भागांमध्ये पावसाने घातले थैमान

Posted by - September 23, 2023 0
पुणे : मागच्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता पावसाने (Pune Rain News) दमदार पुनरागमन झाले आहे. पुणे…
Pune News

Pune News : पुण्याला विकसित अन् प्रेरणादायी शहर बनवायचंय : सुनील देवधर

Posted by - January 30, 2024 0
पुणे : विकसित भारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे तिसरे पर्व येणे आवश्यक आहे. पुणे शहर (Pune News)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *