Pune News

Pune News : ‘हर घर मोदी परिवार’ अभियानात भाजपच्या 10 हजार कार्यकर्त्यांचा सहभाग

389 0

पुणे : भाजपच्या 44व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘हर घर मोदी परिवार’ या अभियानाअंतर्गत पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ 10 हजार कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 10 लाख मतदारांपर्यंत ‘मोदींचा नमस्कार’ पोहोचविण्यात आला. घरोघरी मिळालेला पुणेकरांचा उत्साह भाजपा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारा ठरला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, शहर अध्यक्ष धीरज घाटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांनी अभियानात प्रमुख सहभाग घेतला.

या अभियानाअंतर्गत आज सकाळी सहाही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले. त्यानंतर दहा हजार कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन अडीच लाख कुटुंबातील दहा लाख मतदारांशी संवाद साधला.

अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना, काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 वे कलम हटविले, पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले, 80 कोटी जनतेला मोफत धान्य, 12 कोटी शौचालयांची बांधणी, विकसित भारताच्या दिशेने वाटचाल या मोदी सरकारच्या महत्त्वाच्या उपलब्धींची मतदारांना माहिती देण्यात आली.

बावनकुळे म्हणाले, ‘विकसित भारताच्या संकल्पनेला जनतेने साथ द्यावी अशी विनंती आम्ही करत आहोत. त्याला पुणे शहरातील मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मोदींनी दहा वर्षे केलेले कार्य आणि विकसित भारताचा संकल्प यामुळे जनता कमळ चिन्हाचे बटन दाबून तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान पदाची संधी देईल असा विश्वास वाटतो.’

पाटील म्हणाले, ‘अब की बार 400 पार ही आमची घोषणा आहे. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही घरोघर संपर्क करीत आहोत. लाभार्थी आणि नवमतदारांशी विशेष संपर्क केला जात आहे. लाभार्थ्यांच्या योजना आणि सरकारची दहा वर्षातील कामगिरी लोकांना समजावून सांगण्यात येत आहे. मतदारांना मोदींची गॅरंटी असून ती प्रत्यक्ष मतपेटीतून दिसून येईल.’

मोहोळ म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून मी जनसेवेचे व्रत घेतले आहे. महायुतीने पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात देश विकसित भारताच्या दिशेने प्रगती करत आहे. विकसित पुण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षात शहरात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले आहे. पुण्याला देशातील सर्वोत्कृष्ट शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपण मला मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत, ही विनंती.’

घाटे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा शाश्वत विकास होत आहे. त्यामुळे पुणेकर मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. मुरलीधर मोहोळ हे आजपर्यंतच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास आहे.’

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bus Accident : रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Ashok Hinge Patil : चर्चेतील चेहरा : अशोक हिंगे पाटील

Heatstroke : उष्माघात म्हणजे काय? काय आहेत त्याची लक्षणे?

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा मिळणार? काँग्रेसची वंचितला सर्वात मोठी ऑफर

Junnar News : जुन्नरमधील आर्वी गावामध्ये आढळला बिबट्या; गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Beed News : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा त्यांच्याच उपजिल्हाप्रमुखावर हल्ला

Maharashtra Politics : हक्काच्या जागा मित्र पक्षांना सोडल्याने शिंदे गटाचे आमदार खासदार नाराज; शिंदेंकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Pimpri Video : दारुच्या नशेत शर्ट काढून दहशत पसरवणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

राज्यसभेपेक्षा अधिक मतांनी भाजपा निवडून येईल; अजित पवारांच्या भेटीनंतर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

Posted by - June 20, 2022 0
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे…
Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Posted by - February 22, 2024 0
मुंबई : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. महाविकास आघाडी…
Sant Tukaram

तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डीलाच का असतो? जाणून घ्या यामागची रंजक कथा

Posted by - June 8, 2023 0
येत्या 10 तारखेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचं पहिलं स्थान…
Sandeep Kshirsagar

Sandeep Kshirsagar : ‘माझं घर जळत होतं अन्’…; आमदार संदीप क्षीरसागरांनी गंभीर आरोप करत सांगितला ‘त्या’ घटनेचा संपूर्ण घटनाक्रम

Posted by - December 15, 2023 0
नागपूर : सध्या नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू…

मोठी बातमी : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे 3 कोटींच्या खंडणीची मागणी ; पैसे न दिल्यास …

Posted by - March 27, 2023 0
पुणे : पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने एका बांधकाम व्यावसायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *