Pune-PMC

पावसाळा पूर्व कामांसाठी पुणे महानगरपालिका अ‍ॅक्शन मोडवर

368 0

पुणे : काही दिवसांत पावसाळा सुरु होईल. या पार्श्वभूमीवर पावसाळा पूर्व कामांसाठी पुणे महानगरपालिकेने कामाचा धडाका सुरु केला आहे. नाला साफसफाई करणे, नाला रूंदीकरण व खोलीकरण करणे, पावसाळी लाईन व चेंबर्स साफसफाई करणे तसेच आवश्यकतेनुसार दुरुस्ती कामे करण्यात येत आहेत.

पुणे महानगरपालिकेमार्फत नाल्यामधील 95 क्रिटिकल स्पॉट पैकी 95 क्रिटिकल स्पॉटची साफसफाई केली असून व 382 कल्व्हर्टस पैकी 382 कल्व्हर्टसची 100% साफसफाई पुर्ण करण्यात आली आहे. एकुण नाल्यांच्या लाबी पैकी आवश्यक असणारी165 कि.मी लांबीच्या नाल्यांची साफसफाई व गाळ काढणे व काही ठिकाणी खोलीकरण करण्यात आलेले आहे.

पुणे शहरातील रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचू नये याकरीता दक्षता घेण्यात येत असून आस्तित्वातील चेंबर्स पैकी आवश्यक असणारे 48 हजार चेंबर्समधील गाळ काढला असून 184 कि.मी. लांबीच्या पावसाळी लाईन साफ करण्यात आलेल्या आहेत. तसेच रस्त्यावर पाणी साचु नये म्हणुन फुटपाथचे कडेने नवीन पावसाळी चेंबर्स तयार करून पावसाळी लाईनला जोडण्याची कामे करण्यात येत आहेत. आशा प्रकारे क्रिटीकल स्पॉट, कल्व्हर्टस, नाले साफसफाई व स्टॉर्म वॉटर चेंबर्स व नलिका आवश्यकतेनुसार सर्व साफसफाईची कामे पुर्ण करण्यात आलेली आहे..

पावसाळा कालावधी मध्ये देखील ही साफ सफाईची कार्यवाही सुरू राहणार आहे. याकरीता पुणे मनपा भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून त्यासाठी फोन नं. 1) 9689930531 2) 9689935462 या नंबर व्हॉटसअप द्वारे 24X 7 नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे. तसेच पावसाळी कालावधी मध्ये आपत्ती व्यवस्थापने अंतर्गत रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन निवारण करणेकरीता कनिष्ठ / शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाचे स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून बिगारी सेवक रात्रपाळीत ठेवण्यात आलेले आहेत.

Share This News

Related Post

नविन दिशाहीन घोषणा जाहीर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घोषित केलेल्या कामांचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करावा – इम्तियाज जलील

Posted by - June 5, 2022 0
औरंगाबाद शहरात ०८ जुन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत असून या सभेत ठाकरे यांनी नेहमी प्रमाणे धार्मिक मुद्दे,…

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022 0
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या…

गुणरत्न सदावर्ते यांना गावदेवी पोलिसांची नोटीस… सदावर्ते म्हणाले.. ‘घाबरणार नाही, लढणार’

Posted by - May 11, 2022 0
मुंबई- मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. त्यामुळे गावदेवी पोलिसांनी आज त्याची चौकशी केली. गावदेवी पोलिसांनी…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल : भोर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय ; सरपंचपदासह दोन्ही ग्रामपंचायतींवर रोवला झेंडा ; थोपटेंना धक्का

Posted by - September 19, 2022 0
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये दोन्हीही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भोलावडे…
Maratha Reservation Protest

Maratha Reservation : पुणे जाळपोळ प्रकरणात 400 जणांविरोधात गुन्हा दाखल

Posted by - November 1, 2023 0
पुणे : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात हिंसक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *