पुणे-मुंबई-पुणे : प्रगती एक्स्प्रेस मार्गांवर २५ जुलैपासून धावणार

284 0

मुंबई : मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी पुणे-मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा एकदा प्रगती एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाकाळात प्रगती एक्स्प्रेस बंद होती. प्रगती एक्स्प्रेस पुन्हा सुरू करताना तिला विस्टाडोम डबा (पारदर्शक काचेचा डबा) जोडण्यात येणार आहे.

ही गाडी २५ जुलैपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मडगाव एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्स्प्रेस पूर्वीपासूनच विस्टाडोम डब्यांसह धावत आहेत.

गाडी क्रमांक १२१२५ प्रगती एक्स्प्रेस सीएसएमटी येथून २५ जुलैपासून दुपारी ४.२५ वाजता सुटेल आणि पुणे येथे सायंकाळी ७.५० वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक १२१२६ पुणे येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. ही एक्स्प्रेस दादर, ठाणे, पनवेल, कर्जत, लोणावळा, शिवाजी नगर येथे थांबेल.

या गाडीला ११ द्वितीय श्रेणीचे आसन डबे जोडण्यात आले आहेत. यातील पाच डबे आरक्षित आणि चार अनारक्षित, एक डबा पासधारकांसाठी आणि एक महिलासाठी राखीव असणार आहे. एका वातानुकूलित आसन डबाचाही समावेश आहे. एक जनरल द्वितीय श्रेणी डबाही जोडण्यात आला आहे. या गाडीचे आरक्षण २० जुलैपासून उपलब्ध आहे.

Share This News

Related Post

Mumbai Airport

गेल्या 12 तासांपासून मुंबई एअरपोर्टवर अडकले 300हून अधिक प्रवासी

Posted by - May 26, 2023 0
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) मोठी गर्दी आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झाले…

महत्वाची बातमी : बारावीचा निकाल २ जूनपूर्वी तर दहावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होणार

Posted by - March 25, 2023 0
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सध्या दहावी-बारावी परीक्षा घेतल्या जात असून दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर आहे. बारावीचा निकाल…
Pune News

Pune News : ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार

Posted by - February 12, 2024 0
पुणे : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ ‘आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थे’च्या शाळांसाठी 3 कोटी रुपयांची मदत (Pune News) करणार आहे. याबाबत इंद्राणी…

“हे गणराया राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे…!”- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे श्रीमंत दगडूशेठ गणपतीला साकडे VIDEO

Posted by - September 1, 2022 0
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेतलं यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विश्वजित कदम, माजी गृहराज्यमंत्री…

पुणे : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी तातडीने निधी उपलब्ध करावा : खासदार गिरीश बापट

Posted by - July 19, 2022 0
नवी दिल्ली  : हडपसर रेल्वे स्थानकाचा विकास करणेसाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत खासदार बापट यांनी आज लोकसभेत कलम ३७७ अन्वये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *