Monsoon Update

आयएमडीने राज्यातील मान्सूनबाबत दिले ‘हे’ महत्वाचे अपडेट

536 0

पुणे : बिपरजॉय चक्रीवादळ हे गुजरातमधून राजस्थानात गेले आहे. सध्या हे चक्रीवादळ राजस्थान, पाकिस्तानच्या काही भागात आहे. तसेच त्याचा वेग फार कमी झाला आहे. तसेच पुढच्या 6 तासात त्याचा वेग अजून कमी होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा मान्सूनवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यात मान्सून 11 जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे आपल्याला अजून काही काळ मान्सूनची वाट पहावी लागणार आहे असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.

सध्या कुठे आहे मान्सून
मान्सून रत्नागिरीतच थांबला असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अरबी समुद्रात आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रगतीला विलंब झाला आहे. नैऋत्य मान्सून भारतात 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. त्यानंतर देशभरात त्याची वाटचाल सुरु होते. परंतु नैऋत्य मान्सूनला पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत असली तरी त्याला काही काळ लागणार आहे.

Share This News

Related Post

ED

Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना सीबीआयकडून अटक

Posted by - June 28, 2023 0
मुंबई : वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक…

अन्न व औषध प्रशासनातर्फे पनीर विक्रेत्यावर कारवाई ; 104 किलो पनीरचा साठा जप्त

Posted by - September 29, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवार पेठेतील मे. तिरुमल्ला डेअरी या पनीर विक्रेत्यावर कारवाई करुन २७ हजार ४० रुपये…
Ajit Pawar and Narendra Modi

Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही : अजित पवार

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे- फडणवीस सरकारला पाठींबा दिला. त्यांनतर अजित पवारांनी (Ajit…
Ajit Pawar

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) आज मोठी फूट पडली आहे. आज…

“चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला…!” ; उद्धव ठाकरेंची सडेतोड प्रतिक्रिया

Posted by - March 24, 2023 0
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबद्दलची नोटीसही त्यांना देण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *