Pune Metro

Pune Metro : आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे उदघाटन

248 0

पुणे : पुणे मेट्रोच्या (Pune Metro) रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. नरेंद्र मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मार्गाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते आज पार पडले.

कसा असेल मेट्रोचा मार्ग?
रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गावर बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर आणि रामवाडी ही स्थानके आहेत. हा मार्ग ५.५ किलोमीटरचा आहे. रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा स्थानक सध्या वगळण्यात आले आहे. येरवडा स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा एक जीना नगर रस्त्यात येत असल्याने महापालिकेने तो दुसरीकडे हलविण्यास सांगितले होते. त्यानुसार महामेट्रोकडून जीना दुसरीकडे करण्याचे काम सुरू झाले आहे.

मेट्रोची वेळ काय असेल?
सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत दोन्ही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू राहणार आहेत. – गर्दीच्या वेळेत दर 10 मिनिटांनी प्रवाशांना मेट्रो उपलब्ध असणार आहेत. – 12 ते 4 या वेळेत दर 15 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असणार आहेत.

तिकीट दर काय असणार आहे?
वनाझ ते रामवाडी ₹30 पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट ₹30 वनाझ ते पिंपरी चिंचवड ₹35 रूबी हॉल ते पिंपरी चिंचवड ₹30 वनाझ ते डेक्कन जिमखाना ₹20 पिंपरी चिंचवड ते पुणे स्टेशन ₹30

तिकिटदरांत सवलत
पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिकिटदरात सवलत देण्यात आली आहे. पदवीपर्यंतच्या विध्यार्थ्यांना ₹30% सवलत देण्यात आली आहे. तर, शनिवार रविवार सर्वांना ₹30% सवलत मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Trikonasana : त्रिकोणासन करण्याचे काय आहेत अद्भुत फायदे ?

Share This News

Related Post

Nitin Desai

Nitin Desai : नितीन देसाई यांचे आत्महत्येची ‘न्यायालयीन चौकशी’ व्हावी : गोपाळ तिवारी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : महाराष्ट्रातील नामवंत, मनस्वी व जेष्ठ कला दिग्दर्शक स्व. नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्येपुर्वी आपल्या ॲाडीओ क्लिप…

सुवर्णमहोत्सवी वर्षात जनकल्याण समितीतर्फे ‘सेवा भवन’ची निर्मिती

Posted by - February 3, 2022 0
पुणे- रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला रथसप्तमीच्या दिवशी (7 फेब्रुवारी 2022 ) प्रारंभ होत असून या वर्षात अनेकविध…

भले बुरे जे घडून गेले जरा विसावू या वळणावर

Posted by - March 15, 2022 0
पुणे महापालिकेच्या निवडणुका होईपर्यंत आजपासून महापालिकेत प्रशासकराज सुरू होणार आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा पार पडली. महापालिकेच्या…
accident

पुणे : हडपसर येथे जुन्या कालव्यात कार पडल्याची दुर्घटना ; पहा फोटो

Posted by - September 19, 2022 0
पुणे : आज सकाळी १० वाजता हडपसर, भिमनगर-शिंदेवाडी येथील जुना कालवा या ठिकाणी एक चारचाकी वाहन पडल्याची वर्दि अग्निशमन दलाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *