Pune News

Pune News : मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र; म्हणाले…

320 0

पुणे : महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे (Pune News) जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून हि कारवाई करण्यात आली आहे. या निलंबित काळात त्यांची बदली नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. आता याप्रकरणी डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

डॉ. भगवान पवार यांनी काय केला आरोप?
डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव आणि अप्पर मुख्य सचिव यांचा उल्लेख केला आहे. यात त्यांनी मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची काम करण्यास सांगितली. त्यासोबतच इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला. पण मी नियम बाह्य काम केली नाहीत म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे, असा आरोप डॉ. भगवान यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

bhagwan pawar letter

बदलीच्या आदेशाला मॅटमध्ये आव्हान
भगवान पवार यांनी त्यांच्या बदलीच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्यानंतर मॅटने भगवान पवार यांना पुन्हा आरोग्य प्रमुख म्हणून नियुक्त केलं. दरम्यान, त्यांच्यावर सेवेतील कामात अनियमितता आणि सहकाऱ्यांना त्रास देण्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली गेली. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभाग प्रमुख पदी नियुक्तीनंतर साडेतीन महिन्यातच त्यांची बदली केली गेली होती. या बदलीविरोधात मॅटकडे पवार यांनी दाद मागितली. पण आरोग्य मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हान दिल्यानं पवार यांनी जिथे सेवा केली तिथे तिथे त्यांची चौकशी केली गेली. त्यानंतर पवार यांच्याविरोधात अहवाल तयार करून तो राज्य सरकारकडे सादर केला गेला. यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

पुणे : बोपदेव घाटात PMP चा अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

Posted by - November 8, 2022 0
पुणे : मंगळवारी दुपारी पीएमपीचा अपघात झाला. या अपघातामध्ये पीएमपी मधील तीन-चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.…

‘शिवाई’ या पहिल्या विद्युतप्रणालीवरील बसचे लोकार्पण व विद्युत प्रभारक केंद्राचे उद्घाटन (व्हिडिओ)

Posted by - June 1, 2022 0
पुणे- राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत काळानुरूप बदल केले असून महामंडळाच्या बसच्या माध्यमातून सुरक्षित अणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न…

शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजारांचे अनुदान ; अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सुमारे 14…

विचारांचं सोनं कुठलं ? इथं तर दोघांनी मिळून एकमेकांना धुतलं..! (विशेष संपादकीय)

Posted by - October 6, 2022 0
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काल बुधवारी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे पार पडले. एक शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावर तर दुसरा बीकेसीच्या मैदानावर… ठाकरे…

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक, पण या निर्णयाचा आदर राखला जाईल का ? – ऍड प्रकाश आंबेडकर

Posted by - September 28, 2022 0
पुणे – शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *