Pune loksabha

Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या रिंगणात ‘AIMIM’ची एन्ट्री; त्यामुळे कोणाला होणार फायदा अन् कोणाला बसणार फटका?

414 0

पुणे : पुणे लोकसभेच्या (Pune Loksabha) रिंगणात ‘एआयएमआयएम’ पक्ष देखील उतरला असून त्यामुळे आता पुणे लोकसभेची लढत चौरंगी होणार आहे या चौरंगी लढतीचा नेमका फायदा कोणाला होणार त्याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेऊया…

एआयएमआयएम या पक्षाकडून पुणे महानगरपालिकेत चे माजी स्थायी समिती अध्यक्ष अंनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे रिंगणात आहेत आता सुंडके यांच्या उमेदवारीमुळे आता पुणे लोकसभेच्या रिंगणात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अनिस सुंडके हे पुण्यातील कोंढवा या भागातून पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. एआयएमआयएमच्या पुणे लोकसभेतील एन्ट्रीमुळं मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासमोर तगडं आव्हान उभं राहिलं असून मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. जर मुस्लिम मतांचं विभाजन झालं तर त्याचा भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना होईल आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांना सर्वाधिक फटका बसेल. मागील तीन निवडणुकांमध्ये पुणे लोकसभेची स्थिती नेमकी कशी होती? यावर एक नजर टाकुयात…

2009 पुणे लोकसभा
2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपा आणि मनसे अशी थेट लढत झाली होती..
काँग्रेसकडून सुरेश कलमाडी भाजपाकडून अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजीत शिरोळे निवडणुकीच्या रिंगणात होते..
या निवडणुकीत सुरेश कलमाडी यांना 2 लाख 79 हजार 973 मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 38.11% इतकी होती..
भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 2 लाख 54 हजार 272 इतकी मतं मिळाली होती. त्यांच्या मतांची टक्केवारी 34.61% इतकी होती.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रणजीत शिरोळे यांनी निवडणूक लढवली होती शिरोळे यांना 75 हजार 930 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 10.34% इतकी होती..

2014 पुणे लोकसभा
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा काँग्रेस मनसे आणि आम आदमी पार्टी अशी चौरंगी लढत झाली होती..
या निवडणुकीत भाजपाच्या अनिल शिरोळे यांना 5 लाख 69 हजार 825 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 57.33% इतकी होती..
काँग्रेसच्या डॉक्टर विश्वजीत पतंगराव कदम यांना दोन लाख 54 हजार 56 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 25.56% इतकी होती
मनसे कडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या दीपक पायगुडे यांना 93 हजार 502 इतकी मतं मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी 9.41% इतकी होती
आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवणारे सुभाष वारे यांना 28 हजार 657 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 2.88% इतकी होती.

2019 पुणे लोकसभा
2019 च्या निवडणुकीमध्ये भाजपा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली होती
या तिरंगी लढतीत भाजपाच्या गिरीश बापट यांना सहा लाख 32 हजार 835 इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या मतांची टक्केवारी 61.10% इतकी होती
काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या मोहन जोशी यांना 3 लाख 82 हजार 207 इतकी मतं मिळाली होती तर त्यांच्या मतांची टक्केवारी 29.76% इतकी होती.
वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवणाऱ्या अनिल जाधव यांना 64 हजार 793 इतकी मतं मिळाली असून त्यांच्या मतांची टक्केवारी 6.26% इतकी होती..

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

T- 20 World Cup : टी- 20 वर्ल्ड कपसाठी ‘या’ 5 विकेटकिपर खेळाडूंनी सिद्ध केली दावेदारी

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक आम्ही जिंकूच ! – चंद्रशेखर बावनकुळे

Posted by - October 14, 2022 0
मुंबई : अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गट आणि ठाकरे गट पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक आता दोन्हीही गटांसाठी…
Pune News

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Posted by - March 9, 2024 0
पुणे : पुण्यातल्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून आज कारवाई (Pune News) करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर…

Porsche Car Accident | पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिला 300 शब्दांचा निबंध, ट्रॅफिक पोलिसांबरोबर कामही करणार.. वाचा सविस्तर

Posted by - July 5, 2024 0
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात ज्या निकालाची सगळ्यात जास्त चर्चा झाली होती. त्याच निकालाच्या अंमलबजावणीला आता सुरुवात झाली आहे. अर्थात…

हीच का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ?

Posted by - April 1, 2023 0
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा स्तर ढासळत चालला असून जनहिताच्या मुद्द्यांपेक्षा वैयक्तिक हेवेदावे यांनाचं सत्ताधारी विरोधक जास्त प्राधान्य देत असल्याचं…
UPSC Results

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Posted by - April 17, 2024 0
पिंपरी-चिंचवड : काल UPSC परीक्षाचा निकाल जाहीर झाला. या निकालात पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा देशात 359…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *