Police

Pune loksabha Election : पुण्यातील कोरेगाव पार्क येथे वाहतुकीत बदल; ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर

147 0

पुणे : पुण्यात आज चार लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी पार पडणार असून सकाळी ८ पासून मतमोजनी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात आणि जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात आज पहाटे ६ पासून वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यावर येथील वाहतूक ही पुर्ववत केली जाणार आहे.

पुण्यात आज शिरूर, बारामती, मावळ व पुणे शहर या चार लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी पार पडणार असून पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. त्यामुळे या परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. तर ठीक ठिकाणी बॉम्बशोधक व नाशक पथक तैनात करण्यात आले आहेत.

पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी येणाऱ्यांची संख्या पाहता वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली असून कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 वाहनक्षमता असलेले दुचाकी वाहनतळ फक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले असून नागरिकांसाठी रोही व्हिला लॉन्स लेन नं.7, कोरेगाव पार्क येथे 600 ते 700 वाहनक्षमतेचे दुचाकी व चारचाकी वाहनतळ तर द पूना स्कूल ॲन्ड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट, नॉर्थ मेन रोड, कोरेगाव पार्क येथे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी 800 ते 900 वाहनक्षमता असलेल्या चारचाकी वाहनतळाचे नियोजन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 4 उपायुक्त, 6 सहायक आयुक्त, 150 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, 170 उपनिरीक्षक, 1200 पोलीस कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेतील 700 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या बाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, शहरातील विविध पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालय परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला असून शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली आहे.

Share This News

Related Post

” महाराष्ट्र लढवय्यांचा…कष्टकरी शेतकऱ्यांचा , रडायचं नाही, लढायचं…! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळीराजाला दिला दिलासा

Posted by - August 23, 2022 0
मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत…
Anis Sundke

Pune News : हा देश जितका हिंदूंचा तितकाच मुसलमानांचा सुद्धा आहे : अनिस सुंडके

Posted by - April 30, 2024 0
पुणे : सर्वधर्म समभाव असणारा आपला भारत देश कधीही धार्मिक किंवा जातीय राजकारणाचा भाग झाले नाहीत. पण आता देशात (Pune…
Supriya Sule

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईचा प्रश्न सोडवा, सुप्रिया सुळे यांची मागणी (व्हिडिओ)

Posted by - May 11, 2022 0
पुणे- केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झाले आहे. तर मग पैसे तुमच्यापाशी कशाला ठेवलेत ? महागाई कमी…
Ajit Pawar

Loksabha : अजितदादांची मोठी खेळी; अखेर ‘तो’ बडा नेता लागला हाती

Posted by - April 4, 2024 0
धाराशिव : लोकसभा (Loksabha) निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महायुतीकडून अनेक जांगावर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही जागांचा…

ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर चक्क माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक

Posted by - May 28, 2022 0
पुणे- पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाड्याच्या कमानीवर माजी नगरसेविकेच्या सासूच्या नावाचा फलक लावण्यात आला आहे. विविध संघटनांनी याबाबत आक्षेप नोंदवला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *