Loksabha 2024

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

151 0

पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1 हजार 505 तक्रारींपैकी 1 हजार 329 तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्याने कारवाई करण्यात आल्याची तर तथ्य आढळले नसलेल्या उर्वरित 176 तक्रारी वगळण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर सी-व्हिजिल कक्ष कार्यान्वीत आहे.

सी-व्हिजिल ॲपवर नागरिक माहिती, छायाचित्र, चित्रफीत अपलोड करुन आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करु शकतात. नागरिकांना आपली ओळख उघड न करता तक्रार दाखल करण्याची सोय या ॲपमध्ये आहे. अशा प्रकारे 15 मार्चपासून आतापर्यंत 1 हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 1 हजार 329 तक्रारींवर कारवाई तर उर्वरित 176 तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर वगळण्यात आल्या.

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते.

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त तक्रारी व कंसात कारवाई झालेल्या तक्रारी –
आंबेगाव विधानसभा-23 (16), बारामती-54 (30), भोर-3 (2), भोसरी-4 (3), चिंचवड-33 (22), दौंड-28 (19), हडपसर-47 (40), इंदापूर-47 (40), जुन्नर-37 (35), कसबापेठ-247 (223), खडकवासला-78 (71), खेड आळंदी-3 (1), कोथरूड-43 (32), मावळ-45 (30), पर्वती-258 (257), पिंपरी-11 (9), पुण कॅन्टोन्मेंट-109 (91), पुरंदर-11 (8), शिरूर-32 (15), शिवाजीनगर-71 (70) व वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात – 321 (315) अशा एकूण 1 हजार 505 तक्रारी प्राप्त झाल्या व 1 हजार 329 तक्रारींवर कारवाई झाली.

जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार 13 मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तेथील छायाचित्र किंवा चित्रफीत काढावी आणि तत्काळ सी-व्हिजिल ॲपवर अपलोड करावे किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आणि 18002330102 आणि 1950 टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

Share This News

Related Post

पुणे : बोपदेव घाटात PMP चा अपघात; प्रवासी किरकोळ जखमी

Posted by - November 8, 2022 0
पुणे : मंगळवारी दुपारी पीएमपीचा अपघात झाला. या अपघातामध्ये पीएमपी मधील तीन-चार प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.…
Pune News

Madhav Bhandari : सर्वाधिक घटनादुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या; भाजप संविधान बदलणार नाही- माधव भंडारी

Posted by - April 28, 2024 0
पुणे : भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या. घटनेची चौकट बदलण्याचे आणि मोडतोड करण्याचे काम माजी पंतप्रधान पंडीत…
Sharad Pawar Shirur

मोठी बातमी! शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; ‘या’ नावावर झालं शिक्कमोर्तब

Posted by - June 5, 2023 0
पुणे : आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची पदाधिकारी बैठक…
Pune News

Pune News : चोखंदळ पुणेकर खवय्यांच्या ‘मेहमाननवाजी’ला ‘शालिमार’चा थाट

Posted by - April 4, 2024 0
पुणे : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिना (Pune News) सध्या सुरू असून, मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय खवय्ये आतुरतेने या महिन्याची वाट…

PUNE CRIME कोल्हापूरचा ‘डॉक्टर डॉन’ इंदूरमधून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या जाळ्यात

Posted by - October 14, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका व्यवसायिकाचे अपहरण झाले. या व्यवसायिकाकडून 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यासह बलात्काराचा खोटा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *