Maharashtra Election

Pune Loksabha : लोकसभा निवडणूक मतदानादिवशीचे आठवडे बाजार राहणार बंद

135 0

पुणे : जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी भरणारे सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी आदेश जारी केले आहेत.

मुंबई मार्केट अँड फेअर ऍक्ट १८६२ चे कलम ५ अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यातील टाकवे बु., शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जुन्नर तालुक्यातील बेल्हे, आंबेगाव तालुक्यातील धामणी, लाखणगाव, नागापूर, महाळुंगे पडवळ व तिरपाड, खेड तालुक्यातील कुरकुंडी, शिरूर तालुक्यातील केंदूर, तळेगांव ढमढरे, वडगांव रासाई व संविदणे या ठिकाणचे आठवडे बाजार १३ मे रोजी बंद राहतील.

या आदेशाचे कोणत्याही व्यक्तीने उल्लंघन केल्यास मुंबई मार्केट अँड फेअर ऍक्ट १८६२ मधील तरतुदीनुसार दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

 

Share This News

Related Post

Pune News

Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा – चंद्रकांत पाटील

Posted by - August 21, 2023 0
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या (Katraj-Kondhwa Road) रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करुन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करावे, रस्त्यासाठी आवश्यक भूसंपादनाची…
Report On Voter

Election Commissions : सायंकाळी 6 वाजल्यानंतरही मतदान सुरु राहणार ; निवडणूक आयोगाचा निर्णय

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : महाराष्ट्रातील 13 मतदार संघात आज शेवटच्या टप्प्यातील मतदान (Election Commissions) होतंय. आधीच्या 4 टप्प्याप्रमाणे पाचव्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी…

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार – दीपक केसरकर

Posted by - August 25, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची व्यापक बैठक बोलावली जाईल, असे मंत्री दीपक केसरकर यांनी आज…

‘अरे मी तर तुझाच मावळा’ ; शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मनसेचे नेते वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात…

ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या दुकानांमधून २५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Posted by - April 4, 2022 0
पुणे – ब्रँडेड कंपनीचे लेबल लावून बनावट जिन्स पँटची विक्री करणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *