Pune Isis Module

Pune Isis Module : एनआयएचा मोठा निर्णय ! पुणे इसिस मॉड्यूलमधील 4 जणांवर प्रत्येकी 3 लाखांचे बक्षीस

406 0

पुणे : पुणे शहरात 18 जुलै रोजी पुणे पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक (Pune Isis Module) केली होती. या दोन्ही दहशतवाद्यांचा संबंध इसिसशी असल्याचे तपासातून उघड झाले होते. पुणे शहरात उघड झालेल्या या इसिस मॉड्यूलमुळे मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेत तपास सुरु केला. आता एनआयएकडून या प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई केली जात आहे.

4 वॉटेंड आरोपीवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील चार वॉटेंड आरोपींवर प्रत्येकी तीन लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. आरोपींना पकडून देणाऱ्यांना हे बक्षिस दिले जाणार आहे. महमद शहनवाज शफीज उम्मा आलम अब्दुल, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल शेख फय्याज बायपरवाला, ताला लिवाकत खान अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेदेखील जाहीर करण्यात आले आहे. दहशतवादी संघटनेचा प्रचार आणि प्रसार केल्याप्रकरणी हे चार आरोपी एनआयएच्या वॉटेंडच्या यादीत आहे.

7 आरोपींना अटक
NIA ने ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी पुणे शहरातील कोंढवामध्ये एका घरात काम करत होते. याठिकाणी त्यांनी आयईडी बनवले होते. तसेच बॉम्ब बनवण्याची कार्यशाळाही घेतली होती. तसेच सातारा जंगलात जाऊन बॉम्बची चाचणीदेखील घेतली होती.

Share This News

Related Post

Crime News

Crime News : वाढदिवसाच्या बॅनरला पाय लागल्यामुळे तरुणाला केली मारहाण; संतापाच्या भरात तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - July 21, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आपली आणि कुटुंबाची बदनामी होत असल्याच्या कारणातून…

चांदणी चौकातील राडारोडा हटवण्याचा काम सुरू वाहतूक अजूनही बंदच

Posted by - October 2, 2022 0
पुणे:प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून शनिवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री २.२३ वाजता…

कमाल त्या चोरट्याची ! बाईकचे लॉक तोडता आले नाही म्हणून चाकं काढून नेली

Posted by - March 25, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र चोरीचे घटना उघडकीस आली आहे. शहरातील बीड बायपास रोड वरील अल्पाइन हॉस्पिटल…

PUNE CRIME : पुण्यात कोयता गॅंगची दहशत वाढली! वेळू पेट्रोल पंपावर दरोडा; चार कामगारांना जखमी करून रोकड लुटली, पहा व्हिडिओ

Posted by - December 24, 2022 0
पुणे : पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चाललीये. काल शुक्रवारी रात्री पुणे-सातारा महामार्गावरील वेळू येथील श्रीराम पेट्रोल पंपावर काही…

चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडवून जनतेला दिलासा द्या- एकनाथ शिंदे

Posted by - August 28, 2022 0
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *