Pune News

Pune News : आईसोबतचा ‘तो’ सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीदरम्यान 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

85834 0

पुणे : पुण्यासह (Pune News) पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त अनेक ठिकाणी उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात येत होते. यादरम्यान पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे गणपती विसर्जन सुरू उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडयेथे एका 4 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अर्णव आशिष पाटील असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
अर्णव पाटील हा मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये राहत होता. गणेश विसर्जनाच्या दिवशी सोसायटीतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी तो आला होता. पाण्याच्या टाकीच्या शेजारी उभा राहून तो विसर्जनाची मिरवणूक पाहत होता. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. यादरम्यान अर्णवचा तोल गेला आणि त्याचा पाण्याच्या टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्यावेळी घटना घडली तेव्हा सोसायटीच्या आवारात लेझीम नृत्य सुरू होते. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असतानाच अर्णव हा टाकीत पडला. सारेच मिरवणुकीत दंग असल्याने अर्णव टाकीत पडल्याचे कोण्याचाच लक्षात आलं नाही. यासंबंधी एक व्हिडिओही समोर आला आहे. तर, सोसायटीतील कार्यक्रमासाठी अर्णव छान तयार होऊन आला होता. अर्णव आणि त्याच्या आईनेसोबत सेल्फीही काढला होता. त्यांच्या हा सेल्फी अखेरचा ठरला आहे. अर्णवच्या मृत्यूमुळं परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Related Post

accident

देवीच्या दर्शनाहून परतत असताना कुटुंबावर काळाचा घाला; 4 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2023 0
सांगली : आज सकाळी सांगलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. विटा नेवरी रोडवर हा भीषण अपघात झाला. हा…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजेमुक्त करण्याचा निर्धार

Posted by - October 6, 2023 0
पुणे: पुण्यासह राज्यातील आंबेडकरी जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आगामी जयंती उत्साहात मात्र डीजे आणि लेझर या गोष्टी टाळून करावी असे…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

Posted by - June 5, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन…

#PUNE : दुर्दैवी घटना ; इलेक्ट्रिक फिडरच्या संपर्कात आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू

Posted by - February 9, 2023 0
पुणे : आज दिनांक ०९\०२\२०२३ रोजी सकाळी ०८•४४ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्ष येथे नगर रस्ता, चंदननगर, ९ बीआरडी जवळ…

विश्लेषण : कसबा,चिंचवडची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपासाठी का आहे प्रतिष्ठेची ?

Posted by - February 23, 2023 0
भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकांची घोषणा 18…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *