Fire

Pune Fire News : कात्रज, गोकुळनगर येथे झोपड्यांना आग

471 0

पुणे : आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्ता, केदारेश्वर नगर, पाण्याच्या टाकीजवळ घरामध्ये आग (Pune Fire News) लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून 04 अग्निशमन वाहने व 03 वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते.

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले असता, तेथे झोपड्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली असल्याचे निदर्शनास येताच जवानांनी चार ही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व आग अजून पसरु नये याची खबरदारी घेत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत धोका दुर केला. तसेच या आगीमधे एक गॅस सिलेंडर फुटला आणि इतर सहा सिलेंडर जवानांनी तातडीने बाहेर काढले. आगीमध्ये कोणी अडकले आहेत का याची खात्री केली असता कोणी नसल्याचे समजले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. सदर ठिकाणी एकुण सहा झोपड्या आगीमध्ये पुर्ण जळाल्या. घरामध्ये असलेले सर्व गृहपयोगी साहित्य पुर्ण जळाल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

या कामगिरीत कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, गंगाधाम, काञज अग्निशमन केंद्र येथील अग्निशमन वाहने व मुख्यालयातून वॉटर टँकर तसेच अग्निशमन अधिकारी समीर शेख, सचिन मांडवकर, सुनिल नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 20 ते 25 जवानांनी सहभाग घेतला.

Share This News

Related Post

Sanjay Kakde

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

Posted by - June 29, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज…
Pune News

Pune News : कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही : रामदास आठवले

Posted by - May 2, 2024 0
पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून (Pune News) करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही,…

11 डिसेंबर रोजी पुण्यात पादचारी दिनानिमित्त उद्या लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक बंद

Posted by - December 10, 2022 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील उंबर्‍या गणपती चौक ते गरूड गणपती चौकदरम्यान वॉकिंग प्लाझाचं आयोजन करण्यात…
Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

Posted by - June 16, 2023 0
पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत…
BJP

Akola News : पोलिसांनी धिंड काढलेल्या ‘त्या’ गुंडाचा भाजपमध्ये प्रवेश

Posted by - August 3, 2023 0
अकोला : राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेल्यास (Akola News) पवित्र होतात, अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *