आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

237 0

पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं तब्बल 3 हजार 800 पानांचे दोषारोप पत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 20 आरोपींच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे मुख्य आरोपी आहे. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलिसांकडून वडझरीचे सानप बंधू यांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे.

या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अतुल प्रभाकर राख ( रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा अटक केलेला आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे.

पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होही अशी आशा पोलिसांना आहे.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री कार्यालयातून ससून रुग्णालयात फोन…. दिला हा आदेश… काय आहे प्रकरण ?

Posted by - April 4, 2023 0
कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आल्यानंतर जशी अधिकाऱ्यांची धावपळ उडते तशीच सोमवारी संध्याकाळी ससून रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उडाली. ससून…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी VIDEO

Posted by - September 30, 2022 0
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दुपारी एनडीए चौक (चांदणी चौक) येथील उड्डाणपूल कामाची…

संजय राऊतांची अवस्था स्क्रिझोफ्रेनिया झालेल्या रूग्णासारखी; विजय शिवतारे यांची टीका

Posted by - July 16, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली असून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून ही माहिती…

पुढील आदेश येईपर्यंत निवडणूक प्रक्रियेला स्थगिती ; निवडणूक आयोगाचे महापालिकेला निर्देश

Posted by - August 6, 2022 0
महाराष्ट्र : 4 ऑगस्ट रोजी मिळालेल्या अधिकृत आदेशानुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि त्यातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . दरम्यान…
Mumbai Goa Highway

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी; मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

Posted by - August 12, 2023 0
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावर LPG टँकर पलटी झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *