Pune Crime

Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या

429 0

पुणे : वाकडमधील युमाननगर या ठिकाणच्या रेगलिया सोसायटीमध्ये एक धक्कादायक (Pune Crime) घटना घडली आहे. यामध्ये एका 32 वर्षीय महिलेनं 4 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्रे असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे तर विहान असे 4 वर्षांच्या चिमुकल्याचे नाव आहे. महिलेने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यानंतर त्यांना तातडीने सांगवीतील रुग्णालयात दाखल केले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
कोमल आणि संकेत यांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. संकेत नोकरीनिमित्त अमेरिकेला गेले होते. त्यावेळी कोमलसुद्धा त्यांच्यासोबत गेली. दरम्यानच्या काळात कोमलला मानसिक आजाराचा त्रास सुरु झाला. स्वत:सह मुलाला कुणीतरी मारेल, माझ्या मागे भूत लागलंय अशी भीती वाटू लागली. यामुळे त्यांच्यावर अमेरिकेत उपचारही केले. पण त्रास सुरूच राहिल्याने शेवटी भारतात परतल्या. दोन दिवसांपूर्वीच कोमल आणि त्यांचा मुलगा भारतात आले होते.

पुण्यात कोमल यांच्यावर उपचार केले जाणार होते. त्यासाठी डॉक्टरांची वेळही घेतली होती. त्याआधी कोमल आणि मुलगा विहान वाकडमधील घरी आले होते. सोबत सासू-सासरे आणि कोमलचे आई-वडीलसुद्धा होते. मानसिक त्रास होत असल्यानं कोमल जास्तच घाबरत होत्या. त्यातूनच शनिवारी पहाटे पाच वाजता त्यांनी अकराव्या मजल्यावरून चार वर्षांच्या चिमुकल्यासह उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : प्रेरणा गीतातील ‘त्या’ शब्दांवर आक्षेप घेतल्याने उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर संतप्त टीका

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मृत्यूचे गूढ उकलंल; खून झालेल्या दिवशीचा घटनाक्रम आला समोर

Posted by - June 20, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (MPSC) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंडाचे याअगोदर ‘6’ वेळा केले होते प्रयत्न

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) हे नाव प्रचंड चर्चेत आहे. अजित पवारांनी शिंदे – फडणवीस सरकारला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *