PUNE CRIME NEWS : सराईत गुन्हेगाराला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक ; मोठ्या घातपाताचा अनर्थ टळला

231 0

PUNE CRIME NEWS : पुणे विमानतळ पोलीस पथकाकडून एक मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. राहुल गवळी या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , एअरपोर्टच्या परिसरातून गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून राहुल गवळी हा पळून जात होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला शिताफीनं ताब्यात घेतल आहे. या आरोपीकडून ५ पिस्टलसह 14 राऊंडचा मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे .

दरम्यान राहुल गवळी याच्यावर राज्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील मिळते आहे. मूळचा जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावचा रहिवासी असून पुण्यात घातपातासाठी तो आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे . अधिक तपास विमानतळ पोलीस पथक करत आहे.

Share This News

Related Post

Dhule Accident

Dhule Accident: रस्त्यातील वाहनांना उडवून हॉटेलमधील लोकांना चिरडलं; धुळे अपघाताचे CCTV आले समोर

Posted by - July 4, 2023 0
धुळे : राज्यात सध्या अपघाताचे सत्र सुरूच आहे. धुळे-मुंबई-आग्रा महामार्गावर (Dhule Accident) शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ एक भीषण अपघात झाला.…

पुण्यात आमदाराच्या पुतण्याचा कारनामा; भरधाव वेगात कार चालवत दोघांना चिरडले

Posted by - June 23, 2024 0
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने भरधाव कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. तर…
Pune News

Pune News : पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू..! महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Posted by - June 25, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune News) पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या सुरुवातिलाच धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणचा भोंगळ…
Ajit Pawar Speech

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Posted by - January 18, 2024 0
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा…

पुणे : औंध, पाषाण, बाणेर परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

Posted by - January 2, 2023 0
पुणे : चतु:शृंगी पाणीपुरवठा विभागांतर्गत चतु:शृंगी टाकीच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी औंध, बाणेरसह इतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *