Maharashtra Police

Pune Crime News : पोलिसचं बनला हैवान ! पोलीस अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेवर बलात्कार

539 0

पुणे : पुण्यात (Pune Crime) कायद्याचे रक्षकच महिल्यांच्या सुरक्षेचे भक्षक झाल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढून जेवणासाठी घरी येत असताना गुंगीचे औषध देऊन पोलीस शिपायाने महिला पोलीस कर्मचार्‍यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर पोलीस शिपायाने त्याच्या क्रूरकृत्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेवर सातत्याने बलात्कार केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवून तिला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली.

काय आहे नेमके प्रकरण?
फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही पुणे शहर पोलीस दलात नेमणूकीला असून पोलीस वसाहतीत रहायला आहेत. आरोपीचे नाव दीपक सिताराम मोघे असे आहे. मोघे हा सध्या मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात नेमणुकीवर आहे. दीपक सिताराम मोघे विरोधात एका महिला पोलीस कर्मचार्‍याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार स्वारगेट पोलीस वसाहत तसेच खडकवासला येथील लॉजवर 2020 ते 1 ऑगस्ट 2023 दरम्यान घडल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादीशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो येत होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्या व त्रास होत असल्याने फिर्यादीला त्याने गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन फिर्यादी यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध ठेवले तसेच या घटनेचा व्हिडिओ शूट केला. हा प्रकार समजल्यावर त्यांनी जाब विचारताच त्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचे पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर या व्हिडिओच्या धाकाने आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस येताच खडक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक तोटेवार या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पैसे परत न केल्याने सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर लैंगिक अत्याचार

Posted by - July 26, 2023 0
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अशातच पुण्यातच (Pune News) एक धक्कादायक प्रकार…

रेम्बो सर्कस मधील कलाकारांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप

Posted by - February 5, 2022 0
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देशाला अंत्योदयचा विचार दिला. त्या विचाराला अनुसरूनच माननीय नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या योजना राबवितात.…

शिवजयंती मिरवणुकीला परवानगी द्या, महापौर मोहोळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Posted by - February 12, 2022 0
पुणे- कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यास सलग दोन वर्षे बंधने आल्याने यंदाचा…

शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांची ‘ती’ टेस्ट खोटी, पीडित तरुणीचा आरोप

Posted by - March 31, 2022 0
पुणे- शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला होता. या प्रकरणी कुचिक यांच्या विरोधात गुन्हा देखील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *