Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

568 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने स्कूल व्हॅनच्या समोरील विंडशील्डची तोडफोड केलीपुण्यातील वाघोली येथील बकोरी रोडवर सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात स्कूल व्हॅनचा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

काय घडले नेमके?
सकाळी 9.30 च्या सुमारास वाघोली येथील बकोरी रोडवर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॅन चालक सचिन इंगवले (वय 27) हा काही विद्यार्थिनींना त्यांच्या राहत्या घरी सोडण्यासाठी जात असताना दोन अल्पवयीन तरुणांनी त्यांची व्हॅन अडवून इंगवले यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर दोघांनीही कोयत्याने व्हॅनच्या खिडकीची तोडफोड केली आणि इंगवले यांना जीवे मारण्याची धमकी दिली. लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारणामुळे केला हल्ला?
हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचा इंगवलेंसोबत जुना वाद होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे तपासात समोर आले आहे. अटकेत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या बहिणीने केलेल्या छळाच्या तक्रारीनंतर इंगवले एका संशयितासोबत कोर्टात गेले होते. इंगवले त्या संशयितासोबत गेल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारासह त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इंगवले यांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Related Post

Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Posted by - April 1, 2024 0
पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 30…
crime

खळबळजनक : आयटी अभियंत्याने ८ वर्षाच्या मुलाला संपवले; त्यानंतर पत्नीला दिला असा भयानक अंत, आणि मग स्वतः…

Posted by - March 15, 2023 0
पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यात औंधमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तिघांचेही मृतदेह राहत्या घरात आढळून आले आहेत.…

पुणे तिथे दंडही नाही उणे ! पुणेकरांनी बेशिस्त वाहन चालविण्यासाठी दिला १५ कोटी दंड

Posted by - April 7, 2023 0
पुणेकर दंड भरण्यामध्ये देखील स्वतःला मागे ठेवत नाहीत. वाहन चालवताना नियमाची पायमल्ली करत हजारो पुणेकरांनी दंडाच्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन विभागाला…

BOLLYWOOD : कतरीना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या माथेफिरूच्या विरुद्ध विकीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ; विकीला दिली जीवे मारण्याची धमकी

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : बॉलीवूड जगतातील विशेष करून अभिनेत्रींना त्यांच्या फॅन्स कडून अनेक वेळा विक्षिप्त अशा कमेंट्स येत असतात. त्यांच्या सोशल मीडिया…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *