Pune Crime News

Pune Crime News : प्रेयसीसाठी कायपण ! तिला मिळवण्यासाठी ‘त्याची’ हत्या

885 0

पुणे : म्हणतात प्रेम आंधळं असतं. नुकतीच पिंपरी चिंचवडमधून (Pune Crime News) एक घटना समोर आली आहे. या घटनेमधून याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये प्रेयसीने प्रियकराच्या मदतीनं आपल्या पतीचा काटा काढला आहे. पतीची हत्या अपघाताने झाल्याचा बनाव रचत, एक कोटींचा विमा हडपण्याचा कटदेखील त्यांनी रचला होता. मात्र त्या अगोदरच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने त्यांचे हे बिंग फोडले आहे. सुप्रिया गाडेकर असं पत्नीचं, सुरेश पाटोळे असं जवानाचं आणि रोहिदास सोनवणे असं साथीदाराचे नाव आहे. तर राहुल गाडेकर असे मृत तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
राहुल आणि सुप्रियाचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना चार वर्षाचा मुलगा ही आहे. संसार सुखात सुरु होता. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत सत्तर हजारांच्या नोकरीवर होता.सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोनाकाळात तिने लॅब सुरु केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचे ही चार वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्यांना ही दोन वर्षांची मुलगी आहे. सुप्रिया आणि सुरेश दोघांचे संसार सुरु असताना ही त्यांनी याची कोणतीच फिकीर नव्हती. यादरम्यान सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. यानंतर या सगळ्या त्रासाला कंटाळून सुप्रियाने आपल्या प्रियकरासोबत मिळून राहुलचा काटा काढण्याचा कट रचला.

राहुल थोडक्यात बचावला
डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देहूत त्याच्या घरी आला. अहमदनगर जिल्ह्यातील आते-बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितलं आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले जातील, असं सांगून त्याला ही या कटात सहभागी करून घेतलं. दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून, राहुल कामावर येत होता. याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियकर सुरेशला दिली. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासने पाठलाग सुरु केला, पुढं घारगाव जवळ या दोघांनी राहुलच्या गाडीवर हल्ला करत, त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण सुदैवाने राहुल त्यामधून बचावला.

कशी केली हत्या?
या घटनेमुळं घाबरलेल्या राहुलने घरातचं राहणं पसंत केलं. मात्र पत्नी सुप्रियाने किती दिवस घरी बसून राहणार, असं म्हणत कामावर जाण्याचा तगादा लावला. मग राहुलने कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरु करून घेतली आणि नऱ्हे आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचं ठरवलं. याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली. मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली. 23 फेब्रुवारीला पती पत्नीच्या मामाच्या घरातून चाकण एमआयडीसीमधील कंपनीत कामासाठी निघाला. तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठलं. गाडी आडवी मारून त्याला खाली पाडलं, मग पाठीवर उभं राहून, हातोडीनं डोक्यावर प्रहार केला. त्याचा मृत्यू झाला असल्याची खात्री झाल्यावर ते दोघे तिथून पसार झाले. मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झालाय, असा बनाव केला.

विमा हडपण्याचा होता प्लॅन
राहुलच्या नावाने असणारा एक कोटींचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता. मात्र पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास केला अन पत्नीसह प्रियकराचे बिंग फुटले. पोलिसांनी आरोपीला पत्नीला घरून अटक केली. तर लष्करात कार्यरत असणारा सुरेश आधी दिल्ली अन तिथून सैन्य दलातील टप्प्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तिथं जाऊन सुरेशला आणि रोहिदासला त्याच्या गावातून अटक करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Khadse : सुनबाईपुढे माघार? रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत खडसेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Ramdas Kadam : ‘उद्धव ठाकरेंना कानफाटीत…’; रामदास कदम यांचे मोठे विधान

Vijay Shivtare : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारेंचा अजित पवारांना विरोध कायम; केले ‘हे’ मोठे वक्तव्य

Pune News : पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाचवेळी आढळले 3 बिबटे; धक्कादायक Video आला समोर

Loksabha Election : उद्या दुपारी 3 वाजल्यापासून आचारसंहिता लागू होणार

Paytm Payments Bank : पेटीएम पेमेंट्स बँकेसाठी आज अंतिम मुदत

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Related Post

Accident Video

Accident Video : आधी कारने उडवलं नंतर तरुणीच्या अंगावर घातली गाडी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Posted by - December 27, 2023 0
जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधून एक धक्कादायक घटना (Accident Video) समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.…

निवडणुका नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Posted by - May 22, 2022 0
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांची सभा सुरू आहे.पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही…
Satara, Accident

Satara Accident : मांढरदेवीचे दर्शन घेवून घरी परतणाऱ्या दाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 23, 2023 0
सातारा : साताऱ्यामधून (Satara Accident) अपघाताची एक घटना समोर आली आहे. यामध्ये मांढरदेवीचे दर्शन घेवून घरी जात असताना एका दाम्पत्याचा…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासमवेत ई बाईकवर प्रवास 

Posted by - March 13, 2022 0
पुणेकरांसाठी आजचा रविवार राजकीय वार ठरला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 31 विकासकामांची लोकार्पण,भूमिपूजन तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *