Pune Crime News

Pune Crime News : धक्कादायक ! पोटच्या मुलीची हत्या करून वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या

598 0

पुणे : पुण्यातील वाकड परिसरातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आर्थिक विवंचनेतून‎ एका व्यक्तीने पोटच्या मुलीची हत्या करून स्वतःदेखील आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना काळेवाडी येथे आज (मंगळवार) पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली.

काय आहे नेमके प्रकरण?
भाऊसाहेब भानुदास बेदरे (वय-43, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) असे वडिलांचे तर नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय-8) मृत मुलीचे नाव आहे. बेदरे कटुंब मागील 15 वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे हे खासगी नोकरी करीत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांची नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. परंतु यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याचे त्यांना आर्थिक चणचण भासत होती.

दरम्यान, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री बेदरे या गावी गेल्या होत्या. सोमवारी रात्री त्या गावकडून निघाल्या. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्या शिवाजीनगर येथे आल्या. त्यांनी पतीला फोन करुन गाडी घेऊन येण्यास सांगितले. मात्र, पती न आल्याने त्या घरी आल्या. त्यांवेळी घरात झोपलेल्या 15 वर्षाचा मुलगा आशिष याने घराचा दरवाजा उघडला. यानंतर त्यांनी आपल्या मुलीला जागे करण्याचा प्रयत्न केला मात्र ती उठली नाही. यानंतर त्यांनी घरात पाहिले असता पती भाऊसाहेब यांनी किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भाऊसाहेब आणि नंदिनी यांना तात्काळ वायसीएम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्या ठिकाणी पोलिसांना एक सुसाईट नोट आढळून आली. त्यामध्ये भाऊसाहेब यांनी गावाकडील जागा विकली, मात्र, त्यातून काहीच रक्कम मिळाली नाही, असे लिहिले होते. वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का; ‘या’ केंद्रीय मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Jyoti Mete : ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीला; बीडमधून उमेदवारी मिळणार?

Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब

BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट

Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट

Pune News : आगामी काळात रा.स्व. संघ ‘पंच परिवर्तन’ सूत्रावर आधारित काम करणार प्रांत संघचालक प्रा. सुरेश जाधव

Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक

Dandasana : दंडासन म्हणजे काय ? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

ED

पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन ईडीकडून जप्त

Posted by - May 21, 2022 0
मुंबई- ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने कारवाई करत पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन जप्त केली…
Mandap

भाजपच्या कार्यक्रमादरम्यान अचानक मंडप कोसळला; नितेश राणे थोडक्यात बचावले

Posted by - June 10, 2023 0
अमरावती : अमरावतीमध्ये (Amrawati) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भाजपच्या (BJP) कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळला आहे. मंडप…

घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीचे लॉकअपमधून पलायन, पाहा व्हिडिओ

Posted by - March 22, 2022 0
पुणे- घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या अटकेतील चोरट्याने चक्क लॉकअपमधून धूम ठोकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना चाकण पोलीस ठाण्यात…

‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ स्वीकारणार काश्मीरमधील दहशतवादग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व पुनीत बालन यांची घोषणा

Posted by - April 4, 2023 0
पुणे: जम्मू-काश्मीर खोऱ्यातील दहशतवादग्रस्त कुटुंबांतील मुलाचा शोध घेऊन त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने घेतला आहे. याबाबतची…

चिंचवडमध्ये स्नॅक्स सेंटरमध्ये सिलिंडरला आग, दुकान मालकासह दोघे जखमी

Posted by - May 3, 2022 0
पिंपरी- एका स्नॅक्स सेंटरमध्ये सिलेंडरने पेट घेतल्याने दुकान मालकासह दोघेजण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. ही घटना आज सकाळी ९ वाजण्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *