Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

499 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. बालेवाडी परिसरातील हॉटेल व अपार्टमेंट मध्ये हे सेक्स रॅकेट चालवले जात होते. या कारवाईत उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्रातील 11 तरुणींची सुटका करण्यात आली आहे. तर पाच जणांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात राहुल मदन उर्फ मदन सन्यासी आणि रॉकी कदम, दिनेश उर्फ मामा, नवीन, रोषन (पूर्ण नाव पत्ता महित नाही) यांच्या विरुद्ध आयपीसी 370, 34 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महिला पोलीस हवालदार मनिषा सुरेश पुकाळे यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सुमारास हॉटेल टॅग हाऊस, पॅनकार्ड क्लब रोड वरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलच्या खोलीत करण्यात आली. आरोपी हॉटेलमध्ये रूम बुक करुन त्याठिकाणी पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका करत होते. या छाप्यात पोलिसांनी 6 हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच काही कंडोमची पाकिटे जप्त केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरक्षक भरत जाधव, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, महिला पोलीस उपनिरीक्षक आश्विनी भोसले, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,सागर केकान, अमेय रसाळ, बाबासो कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, हनमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, संदिप कोळगे, अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, महिला पोलिस अंमलदार मनिषा पुकाळे आणि रेश्मा कंक यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Share This News

Related Post

Mumbai CP Vivek Phansalkar : मुंबई पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी; दिवाळीच्या दिवशी अडीच महिन्याच्या बाळाचे अपहरण; असं शोधलं बाळाला…

Posted by - October 27, 2022 0
मुंबई : ऐन दिवाळीच्या दिवशी मध्यरात्री फुटपाथवर झोपणाऱ्या आई-वडिलांसोबत असलेल्या एका अडीच महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले. घाबरलेल्या आई-बापाने आझाद…
Pune Crime

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

Posted by - April 16, 2024 0
पिंपरी चिंचवड शहरात (Pune Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन नरोटे (वय 38, रा.…

पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून आढळली तब्बल चार कोटी रुपयांची रोकड (व्हिडिओ)

Posted by - March 30, 2022 0
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले…

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Posted by - May 31, 2024 0
पुणे : पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. पोर्शे कार अपघातामधील (Pune Porsche Accident…
drowning hands

Yavatmal News : सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या जिवलग मित्रांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 4, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Yavatmal News) तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन जीवलग मित्रांचा बुडून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *