Pune Crime

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

600 0

पुणे: पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेण्यासाठी लातूरहुन पुण्यात आलेल्या एका तरुणीची तिच्याच मित्राने हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याने खंडणीसाठी ही हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
भाग्यश्री सूर्यकांत सुडे (वय 22) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (वय 49) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री सुडे ही वाघोली परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होती. 30 मार्चच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाल्यानंतर तरुणींच्या आई -वडिलांच्या मोबाईलवर ‘नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू’ असा खंडणीसाठी धमकीचा मेसेज आला होता. दरम्यान, मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असून तीनही आरोपी मयत तरुणीचे मित्र असल्याचे समोर आले आहे. 30 मार्चच्या रात्री आरोपींनी भाग्यश्रीचे अपहरण आणि तिचा खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी नगर जिल्ह्यातील सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकण्यात आला. तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Related Post

शब्दांच्या पलीकडची भाषा शिक्षणात आवश्यक- डॉ. मोहन आगाशे

Posted by - February 11, 2022 0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापनदिन थाटात साजरा पुणे- आजच्या शिक्षणात केवळ शब्दांची भाषा आहे मात्र या भाषेपलिकडे ध्वनीची, चित्रांच्या आणि…
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

Posted by - August 4, 2023 0
बुलढाणा : समृद्धी महामार्गावरील अपघाताचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र काही थांबायचे नाव घेईना. आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन…

जावयाने केले सासऱ्यावर चाकूने सपासप वार, खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद

Posted by - April 21, 2022 0
पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये…

कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीर संपन्न डॉ. रजनी इंदुलकर यांची प्रमुख उपस्थिती

Posted by - February 27, 2023 0
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटर, सिग्निया आणि महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने…

‘महाराष्ट्राचा सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा हरपला’ मान्यवरांची श्रद्धांजली

Posted by - March 29, 2023 0
पुण्याचे खासदार गिरीश बापट (वय ७२) यांचे निधन झाले. गिरीश बापट यांनी दीनानाथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *