Pune Crime

Pune Crime : भरधाव वाहनाच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू; पिंपरी चिंचवडमध्ये ‘हिट अँड रन’ची घटना

345 0

पिंपरी चिंचवड शहरात (Pune Crime) अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन नरोटे (वय 38, रा. वाकड) या पोलीस कर्मचाऱ्याला वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई- बेंगलोर हायवे वर घडली आहे.

सचिन नरोटे हे काल ऑन ड्युटी होते. ते काही कामानिमित्त आपल्या दुचाकीवरून पुनावळे परिसरातून देहूरोडच्या दिशेने जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. या अपघातात नरोटे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या वाहनाचा चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी मध्ये आणि अपघातांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दररोज अनेक अपघातात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. त्यातच आता चक्क ऑन ड्युटी असलेल्या पोलिसाला आपला जीव गमवावा लागल्यामुळे शहरात खळखळ उडाली आहे. तसेच वाहतूक पोलिसांसमोर हे अपघात रोखण्याचे आवाहन तयार झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Satara Loksabha : अखेर ! साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर

Nashik News : धक्कादायक ! 16 वर्षाच्या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Nashik Accident : शाळेत जाताना घात झाला; आजोबांसह 2 नातींनी गमावला जीव

Share This News

Related Post

राष्ट्रवादी काँग्रेसने मागवले इच्छुक उमेदवारांचे अर्ज

Posted by - February 16, 2022 0
पुणे- आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर…

देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

Posted by - April 1, 2022 0
पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली…

मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

Posted by - April 1, 2023 0
केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला असून अलिबाग मुख्य न्याय दंडाधिकारी…

डीपीसी बैठकीत अनधिकृत उपस्थिती; तडीपार इसमावर गुन्हा नोंदवून जिल्ह्याबाहेर रवानगी

Posted by - October 18, 2022 0
पुणे : कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अनधिकृतपणे उपस्थित राहिलेला तडीपार इसम प्रदीप बाजीराव जगताप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *