Pune Police

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई! आंतरराष्ट्रीय टोळीकडून साडेतीन कोटी रुपयांचे एम.डी जप्त

545 0

पुणे : पुण्यात (Pune Crime) ड्रग्स तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. यामध्ये त्यांनी तब्बल 3 कोटी 58 लाख रुपये किंमतीचं मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केले. ही कारवाई सोमवार पेठ परिसरात रविवारी (दि.19) रात्री करण्यात आली. यामुळे ड्रग्ज तस्करांचे पुण्यातील रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे.

पोलीस रेकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंट्या भारत माने, त्याचा ड्रायव्हर अजय आमरनाथ करोसिया (य-35 रा. पुणे), हैदर नुर शेख (रा. विश्रांतवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

किती मुद्देमाल केला जप्त?
आरोपी हैदर शेख याच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे 500 एमडी ड्रग्ज, मोबाईल, सॅक, गोडावुनमधून दीड कोटी रुपयांचे 750 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, इलेट्रॉनिक वजन काटा, तसेच वैभव उर्फ पिंट्या माने याच्याकडून एक कोटी रुपयांचे 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज, सॅक, दोन मोबाईल, 8 लाख रुपये किंमतीची इर्टिगा कार जप्त केली आहे. दोघांकडून 3 कोटी 58 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2,सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, अजय वाघमारे, राजेंद्र लांडगे, अनितस हिवरकर, विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर, शेळके, गोरे, कोळेकर, मगदुम, देव, नाईक, जाधव, शिंदे, मोकाशी, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, अभिनव लडकत, दत्ता सोनवणे, निलेश साबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशीकांत दरेकर, शुभम देसाई, शंकर कुंभार, आय्याज दड्डीकर, सुजित वाडेकर, संतोष देशपांडे, निखिल जाधव यांच्या पथकाकडून ही कामगिरी करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime Video : पुण्यातील खराडी परिसरात टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Hemant Godse Car Accident : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात

Pune News : शिवनेरीच्या पायथ्याजवळ लावण्यात आलेले पीएम मोदी, सीएम शिंदेंचे पोस्टर फाडले; 5 जणांना अटक

Shivaji Maharaj Jayanti : शिवजयंती वर्षातून 2 वेळा का साजरी होते?

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394 व्या जयंतीनिमित्त शिवनेरीवर शिवभक्तांची गर्दी 

Share This News

Related Post

Pune News

Pune News : इंद्रायणी नदीत बुडून निगडी येथील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 3, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे पोहण्यासाठी इंद्रायणी नदी पात्रात…

मानाचा पहिला ‘कसबा गणपती’ : … म्हणून कसबा गणपतीस ’जयति गणपति’ असे म्हणतात ; ऐतिहासिक माहिती

Posted by - September 6, 2022 0
पुणे : कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच छत्रपती शिवाजी…
Pune Video

Pune Video : कोंबडी पडली बिबट्यावर भारी; शिकार करायला गेला अन् स्वतःच अडकला जाळ्यात

Posted by - April 20, 2024 0
पुणे : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Pune Video) होताना दिसत आहे. यामध्ये एक कोंबडी बिबट्यावर भारी पडल्याचे दिसत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *