Pune Police Waari

पुणे पोलिसांच्या कॅमेऱ्यातून टिपलेले वारीचे विहंगम दृश्य

484 0

पुणे : आषाढी आणि कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो वारकरी दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. महाराष्ट्रातील ही वारीची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. या एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी भजन-भक्तिगीत म्हणत पायी पंढरपूरला म्हणजेच वारीला जात असतात. पुणे पोलिसांनी सध्या लाखो वारकऱ्यांचा वारीचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडीओत लाखो वारकरी तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह पंढरपूरच्या दिशेने जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे. मनमोहक निसर्गरम्य वातावरणात वारकऱ्यांची मोठी रांग सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

पुणे शहर पोलीस यांच्या अधिकृत @PuneCityPolice या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या व्हिडिओला “पाऊले चालती पंढरीची वाट…” श्री क्षेत्र पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आस लागलेल्या लाखो वारकऱ्यांची पाऊले वेगाने मार्गक्रमण करीत आहेत. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वैष्णवांचा मेळा एक-एक टप्पा पार करीत भक्तिनामात तल्लीन झाला आहे.” असे कॅप्शन दिले आहे.

Share This News

Related Post

या चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही !

Posted by - October 10, 2022 0
हिंगोली : बळीराजाचं आयुष्य हे मेहनतीतच जास्त जाते आहे. त्यात निसर्गाची अवकृपा सर्वात जास्त बळीराजालाच धक्का देऊन जाते. पोटच्या लेकराला…
Thane Accident

Thane Accident : ‘तो’ थांबला अन् दोघांचा गेला जीव; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला थरारक मृत्यू

Posted by - March 9, 2024 0
ठाणे : ठाण्यातील भिवंडीमधून (Thane Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आज सकाळच्या सुमारास एका ऑटो रिक्षाचा अपघात…

पुणे शहरावर अस्मानी संकट; झाडापडी, पाणी शिरणे, सीमाभिंत कोसळणे अशा घटनांनी पुणेकर हैराण ; आतापर्यंत शहरात घडल्या इतक्या घटना

Posted by - October 18, 2022 0
पुणे : दिनांक 17/10/2022 रोजी रात्री 9:45 वाजता पुण्यात मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली. गेल्या सव्वा तासात हवामान खात्याच्या शिवाजीनगर पर्जन्य…

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Posted by - June 1, 2022 0
पुणे – राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती…
Sudhi

धक्कादायक! प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे कार अपघातात निधन

Posted by - June 5, 2023 0
मुंबई : काल रात्री ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे निधन झाल्याची बातमी ताजी असताना पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीतून एक धक्कादायक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *