Pune News

Pune News : पुणे शहर पोलीस आयुक्तांची तातडीने बदली करावी : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी

221 0

पुणे : कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला मिळालेला जामीन आणि एकूण पुण्यातील अपघात प्रकरण यामुळे पुणे पोलीसांची प्रतिमा मलीन झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखली जावी. याकरीता तातडीने पुणे शहर पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी पुणे शहर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीबाबत सविस्तर महिती देत आहे की, कल्याणीनगर हिट अँड रनचा गुन्हा घडल्यानंतर स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे अल्पवयीन आरोपी मुलाच्या रक्त चाचणीला काही काळ उशिर झाला आहे.

याशिवाय एकूण राज्यपातळीवरील अनेक नेत्यांनी यानिमित्ताने पुण्यातील कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीसांवर दबाब टाकण्याचे काम केले आहे. केंद्रातील एका मोठा नेता तर यानिमित्ताने गरीब आणि श्रीमंत अशी दरी तयार करीत आहे. त्यात श्रीमंतांनी गरीबांना गाडीने उडविले तरी त्यांना गुन्ह्यातून सवलत अशी पध्दत विकसित करण्याचे काम केले आहे. पुण्यातील या घटनेची नोंद केंद्र पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहराची असलेली सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणात माहेरघर अशी चांगली ओळख पुसवून याठिकाणी चुकीची संस्कृती विकसित करण्याचे काम होणार असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.

राजा बहादुर मिल परिसरात जे पब चालतात त्याठिकाणी पबचालकांनी आंदोलन केले. ड्रिंक, हिट अँड रन घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने यांच्या परवान्याबाबत कारवाई केली आहे. म्हणून पबवाल्यांनी आज युवकांना सोबत घेउन आंदोलन केले आहे. पुन्हा पुन्हा यांच्या व्यवसायासाठी लहान मोठ्या मुलांचा वापर केला जात आहे. अनधिकृत व्यवसायासाठी याप्रकारे आंदोलन करण्यासाठी पोलीसांकडून परवानगी का दिली गेली ? सदर आंदोलनामधे मुलांचा वापर केल्याबाबत या पब चालकांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.

मद्य व अमली पदार्थांसाठी अल्पवयीन मुलांना पबचालकांकडून अगोदरच प्रोत्साहित करून गिऱ्हाईक बनवले गेले आहे. त्यामुळेच मुलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. आणि आता पुन्हा पब चालकांवर व मालकांनी प्रशासन व सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी मुलांचा वापर केला. याबाबत पब मालकांना कडक शासन झालेच पाहिजे. अन्यथा या पबवाल्यांना पोलीसांची साथ असल्याबाबत शिक्कामोर्तब होईल. आणि म्हणूनच पोलीस आयुक्तांची बदली क्रमप्राप्त ठरते अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Laila Khan Murder Case : अभिनेत्री लैला खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी वडिलांना कोर्टाने सुनावली फाशी

Mumbai Crime : पुण्यानंतर मुंबईतदेखील हिट अँड रनची घटना

Medha Kulkarni : ब्लॅक या पब च्या मालकाचे नाव FIR मधून का वगळले? खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला प्रश्न

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Lifetime Achievement Award : अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Sindhudurga News : मासेमारीसाठी जात असलेली बोट उलटली; दोघांचा मृत्यू तर 2 जण बेपत्ता

Weather Update : आज कोसळणार मुसळधार पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला हायअलर्ट

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात; एका क्षणात हसत्या खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी अंत

Accident News : वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 7 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Supriya-Sule

#PUNE : पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खासदार सुप्रिया सुळे

Posted by - March 9, 2023 0
पुणे : बावधन बुद्रुक येथील पेबल्स सोसायटीच्या समोर असलेला पीएमपी बसचा थांबा पूर्ववत सुर करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया…

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रम; जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी घेतला नियोजनाचा आढावा

Posted by - December 15, 2022 0
पुणे : हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी…

गौरवास्पद ! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार

Posted by - May 24, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व सुजाण नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या टिळक रस्त्यावरील न्यू…
Satara News

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 10, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घडली आहे. यामध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा…
Neelam Gorhe

दीपावलीच्या निमित्ताने राज्यातील शेतकरी महिला, उद्योजक यांच्या शेतमालाला भाव आणि असंघटित कामगारांसाठी सरकारने धोरण आखावे

Posted by - October 23, 2022 0
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालानुसार सुमारे ८० टक्के महिला आर्थिक क्षेत्रात सक्रिय आहेत. यात कृषी क्षेत्रात ३३…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *