Pune News

Pune News : पुणे हादरलं ! दाजीची हत्या करून मेव्हण्याचीदेखील आत्महत्या

587 0

पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने आपल्या दाजीच्या डोक्यात रॉड घालून त्याची हत्या केली आहे. त्यानंतर मेव्हण्याने स्वतःदेखील त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील बाणेर येथील हॉटेल मनाली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
दाजीचे नाव धनंजय पद्माकर ताडेकर (वय 36) आणि आरोपी मेव्हण्याचे नाव हेमंत रत्नाकर काजळे (वय 40) असे आहे. या घटनेमुळं कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. धनंजय साडेकर याचा काजळे यांच्या बहिणीशी विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतरही त्यांच्यात सतत वाद होत होते. बहिणीसोबत वाद घालत असल्याच्या रागातून काजळे यांने धनंजयला जाब विचारला यातून दोघात वाद झाला आणि ही घटना घडली.

साडेकर यांच्या डोक्यात हेमंत काजळे यांनी लोखंडी गज मारला. डोक्यात गज लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व अति रक्तस्त्राव झाला. यानंतर या घटनेची माहिची काजळेने बहिणीला कळवली आणि त्यानंतर त्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली. बहिणीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. चतुःश्रृंगी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Related Post

पोलीस दलातील भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक

Posted by - May 28, 2023 0
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती होण्यासाठी बनावट सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन प्रमाणपत्र सादर करुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केलेल्या उमेदवाराला पोलिसांनी…
Pune News

Pune News : सवाई गंधर्व महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

Posted by - December 17, 2023 0
पुणे : पुण्यात (Pune News) सुरु असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात आगीची मोठी दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी…

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार? सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं

Posted by - October 22, 2022 0
उध्दव ठाकरे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर बऱ्याच दिवसापासून ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपचे नेते व…

#BEED : ‘जो आडवा आला त्याला जेसीबीच्या खाली घ्या’, मुजोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

Posted by - March 1, 2023 0
बीड : बीड मधून एक धक्कादायक प्रकार समोर येत असून शासकीय अधिकाऱ्याने गावकऱ्याच्या अंगावर जेसीबी घालण्याची धमकी दिली आहे. हा…

पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

Posted by - April 9, 2023 0
राज्यात परवापासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. काल तर मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. आज पुण्यात अवकाळी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *