पुणे : दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त देवेंद्र पोटफोडे यांची पुणे अग्निशमन प्रमुख पदी नियुक्ती

991 0

पुणे : राज्य सरकारने, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले श्री देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए ) चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांची महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकाच्या मुख्य अग्निशमन अधिकारी या रिक्त पदावर अतिरिक्त कारभार देऊन नियुक्ती केली असून पीएमआरडीए अग्निशमन विभागा बरोबरच महापालिका अग्निशमन दलाचा कार्यभार पाहणार आहेत. अत्यंत सकारात्मक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्यातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठ्या महानगर पालिका व सर्वात मोठ्या महानगर प्राधिकरण अग्निशमन प्रमुख पदी नेमणूक होताच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला.

देवेंद्र पोटफोडे हे राष्टीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून सुवर्णपदक विजेते असून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांनी अग्निशमन विभागाच्या सेवेत आहे. एमआयडीसीमध्ये तसेच पुणे महानगरपालिका (पीएमसी) चे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणूनही या पूर्वी जबाबदारी सांभाळलेली आहे. एमआयडीसी ची औद्योगिक क्षेत्रे आणि शहरी भागात अनेक फायर, रेस्क्यू कॉल्स, भीषण आगीची दुर्घटना, स्फोट, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनां स्वतःच्या नेतृत्वात यशस्वीरित्या सामना केला असून, अलीकडच्या काळातील, सिरम इन्स्टीटयूटमधील आगीची दुर्घटना आणि पिरगुंट येथील एस व्ही ऍक्वा ही त्यापैकीच काही उदाहरणं आहेत .

बांधकाम नियंत्रण नियमावली आणि एनबीसी च्या तरतुदींनुसार विविध प्रस्तावित नागरी तसेच औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या प्रकल्पांना अग्निशमन मंजूरी देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलीअसून कोविड काळात संपूर्ण राज्यात सर्वात सक्षम व प्रभावी पणे पुणे जिल्ह्यातील रग्णालयांचे फायर ऑडिट समन्वयाचे काम त्यांनी पार पाडले आहे. राज्य सरकारच्या अनेक अग्निशमन विषयक समित्यांवरही तांत्रिक तज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.

अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रिया, दुबई आदी देशातील विकसित अग्निशमन सेवांना भेटी दिल्या आहेत. तर २०११ आणि २०२१ असे दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त असून त्यांनी राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक व विशिष्ट अग्निशमन सेवा पदकही पटकाविलेले आहे. पुणे अग्निशमनदला ची प्रतिमा देशपातळीवर उंचावण्याची मनीषा त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताना केली.

Share This News

Related Post

Tesla Car

Tesla Office Pune Details : टेस्लाचं पहिलं ऑफिस पुण्यात होणार ! कुठे अन् किती असेल ऑफिसचं भाडं

Posted by - August 3, 2023 0
पुणे : जगप्रसिद्ध टेस्ला कारची निर्मिती करणारी टेस्ला (tesla) कंपनीने भारतात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी भारतात पहिलं कार्यालय…

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022 0
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित…

दुर्दैवी ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसहित चौघींचा तलावात बुडून मृत्यू

Posted by - May 14, 2022 0
लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे…

आजपासून पुन्हा शाळा सुरु, पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

Posted by - January 24, 2022 0
मुंबई- राज्यभरात आजपासून बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांची घंटा वाजणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढताना…
Tanisha Bormanikar

Tanisha Bormanikar : बारावी परीक्षेत 100 टक्के गुण मिळवत तनिषा बोरामणीकर आली अव्वल

Posted by - May 21, 2024 0
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यात राज्यातील मुलींनी पुन्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *