Chain Pulling

Pune News : रेल्वेत चेन ओढणाऱ्यांना दणका ! 1164 जणांना अटक

711 0

पुणे : पुणे (Pune) रेल्वेकडून एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत धावत्या रेल्वेची आपातकालीन चेन ओढणाऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत चेन ओढणाचे 1 हजार 404 प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणी 1 हजार 164 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 लाख 19 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेने केवळ आपत्कालीन वापरासाठीच रेल्वे गाड्यांमध्ये अलार्म चेन (emergency chain) पुलिंगचा पर्याय दिला आहे. मात्र स्टेशनवर प्रवासी उशीरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर उतरणे/बोर्डिंग इत्यादी किरकोळ कारणांसाठी या चेनचा गैरवापर करताना दिसत आहेत. या गैरवापरामुळे इतर गाड्यांवरही त्याचा परिणाम होताना दिसतो. यामुळे गाड्या उशिराने धावतात आणि त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो.

तसेच प्रवाशांनी अलार्म चेन अनावश्यक ओढू नये, याकरिता सतत उदघोषणा तसेच रेल्वे गाड्यांमध्ये सूचना बोर्ड लावून दुरुपयोग थांबवा, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाकडून (Railway) करण्यात येत आहे. अलार्म चेन पुलचा वापर करणे हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय गुन्हा मानला जातो. त्यामुळे कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी गाडी सुटण्याच्या वेळेच्या किमान ३० मिनिटे आधी स्टेशनवर पोहोचावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे रेल्वे विभागाकडून प्रवाशांना आवाहन करण्यात आले आहे.

Share This News

Related Post

Dr Rajendra Bhosale IAS

Pune News : डॉ. राजेंद्र भोसले पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त

Posted by - March 15, 2024 0
पुणे : डॉ. राजेंद्र भोसले यांची पुणे महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार यांची बदली करण्यात…
Ratnagiri News

Ratnagiri News : ट्रक – दुचाकीच्या भीषण अपघातात 26 वर्षीय इंटिरिअर डेकोरेटरचा दुर्दैवी अंत

Posted by - October 19, 2023 0
रत्नागिरी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तर अपघाताचे हॉटस्पॉट बनला आहे. खेड तालुक्यातील…

बारामती : इंडियन एयर फोर्सच्या चेतक हेलिकॉप्टरचे करावे लागले अचानक लँडिंग

Posted by - December 1, 2022 0
बारामती : संशयास्पद तांत्रिक अडचणीमुळे आज बारामती एअरफिल्डपासून कमी असलेल्या मोकळ्या भागात आयएएफच्या चेतक हेलिकॉप्टरने सावधगिरीने लँडिंग केले. क्रू आणि…

क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीला भीषण अपघात; रुग्णालयात उपचार सुरू

Posted by - December 30, 2022 0
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. दिल्लीहून घरी जात असताना रुडकीच्या नारसन बॉर्डरवर हम्मदपूर येथे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *