जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 जुलैला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

218 0

मुंबई: राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या 18 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर त्या दिवसापासून 22 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या 29 जुलै 2022 रोजी अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 8 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.

निवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली.

Share This News

Related Post

Sharad Pawar And Supriya Sule

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करावी; सुप्रिया सुळेंचे पवारांना पत्र

Posted by - July 3, 2023 0
मुंबई : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांच्या बंडाला ज्या लोकांनी पाठिंबा दिला…

Jagdish Mulik : महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार वाढदिवसाची भेट

Posted by - July 22, 2022 0
पुणे : येत्या महापालिका निवडणुकीत 100 पेक्षा अधिक जागा जिंकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट देण्याचा निर्धार शहर भाजपचे…

… तर मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल; अंबादास दानवे यांचा खोचक टोला

Posted by - June 30, 2023 0
मुंबई: काही दिवसांपूर्वी हिंगोलीत बोलताना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपण 100% मंत्री होणार असल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी केल्यानंतर आता…

AMRUTA FADNAVIS : विद्यार्थ्यांना भेटून मला नेहमीच आनंद मिळतो ; बीजेएसच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांशी संवाद

Posted by - August 22, 2022 0
पुणे : ‘भारतीय जैन संघटनेच्या वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील विद्यार्थ्यांना सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा भेटले, तेव्हापासून मला विद्यार्थ्यांना सातत्याने भेटायला आवडते.…

निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद

Posted by - November 9, 2022 0
पुणे : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *