Pune

प्रा. नामदेवराव जाधव यांच्या विरुद्ध कोथरूड युवक राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार दाखल

557 0

पुणे : समाजात तेढ निर्माण करणे तसेच शरद पवार यांच्या बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी प्रा. नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांच्या विरोधात कोथरूड येथील युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी अनेक व्हिडिओ तसेच मुलाखती प्रसार माध्यमांच्या मार्फत प्रकाशित केल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचे कारण असल्याचा ठप्पा शरद पवार यांच्यावर ठेवला आहे. तसेच काही वादग्रस्त व टोकाची भूमिका घेणारे शब ही वापरले आहेत. मराठा आणि इतर मागासवर्गीय समाज यांच्या मध्ये संघर्ष निर्माण करणारे अनेक वक्तव्य केल्याचे तसेच शरद पवार यांचे नाव वारंवार घेऊन अनेक बिनबुडाचे आरोप त्यांच्यावर केले असल्याचे नमूद करत गुरनानी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कोथरूड पोलीस स्टेशन येथे निवेदन देत नामदेवराव जाधव यांच्यावर फौजदारी गुन्हा भा. द. वी. कलम 197, 153, 153(अ), 153(ब), 295(अ), 298, 499, 500, 503, 504, 505 (2) प्रमाणे दाखल करावा अशी मागणी केली आहे. असे न केल्यास सदरील व्यक्ति जोमाने जाती धर्माच्या नावाखाली सोशल मीडिया वर खोटी व बनावट माहिती प्रसारित करुन तरुणांना दंगली घडविण्यासाठी प्रोत्साहित करेल याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील हे ही गुरनानी यांनी नमूद केले. या वेळी कोथरूड सामाजिक न्याय विभागाचे विनोद हनवते आणि राष्ट्रवादी युवतीच्या ऋतुजा देशमुख देखील उपस्थित होत्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी अध्यक्षपदी विरेन हनुमंत साठे

Posted by - October 21, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांचा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा

Posted by - October 10, 2023 0
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या…
Navi Mumbai

Navi Mumbai : मोबाईल वर बोलला आणि जिवानिशी मुकला! काय घडले नेमके?

Posted by - January 17, 2024 0
नवी मुंबई : सध्याच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता मोबाईलदेखील आता माणसाची मूलभूत गरज बनली आहे. एकवेळ माणूस न…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *