DRDO

Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी पाकिस्तानच्या संपर्कात? ATS च्या तपासात समोर

411 0

पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (ATS) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांना अटक केली आहे. या प्रकरणी त्यांची अधिक चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रदीप कुरुलकरसह अन्य एक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा एटीएसला संशय आहे.

डीआरडीएचे संचालक प्रदीप कुरुलकर ज्या महिलेच्या संपर्कात होते त्याच महिलेच्या संपर्कात हा एक अधिकारी असल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले आहे. डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या कॉल आणि डेटा तपशीलांची छानणी करत होते तेव्हा त्यांना या गुप्तचर विभागात काम करणाऱ्या अन्य अधिकाऱ्याचा नंबर सापडला.

Breaking : डीआरडीओ चे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना 15 मे पर्यंत ATS कोठडी

या दुसऱ्या अधिकाऱ्याने महिलेसोबत कोणतीही गोपनीय माहिती शेअर केली आहे की नाही याचा तपास सध्या एटीएस अधिकारी करत आहेत. या अधिकाऱ्याचा या हनीट्रॅपमध्ये काही संबंध असल्याचा अजून कोणताच पुरावा पोलिसांना सापडला नाही आहे. मात्र, कुरुळकर यांना हनी ट्रॅप (Honey Trap) करण्यासाठी वापरण्यात आलेला क्रमांक गुप्तचर विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या बाबतीतही वापरण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे.

Share This News

Related Post

Crime

शहरात दुचाकीस्वार चोरटयांचा धुमाकूळ एकाच रात्री सात ठिकाणी नागरिकांना लुटले

Posted by - May 7, 2022 0
पुणे- पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरटयांनी धुमाकूळ घातला असून पोलीस या चोरट्याना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. एकाच दिवसात…

#PUNE : नवले पुलावरून 50 फूट उंचीवरून तरुणीची उडी ! प्रेम प्रकरणातून उचलले टोकाचे पाऊल, पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने असे वाचले प्राण…

Posted by - February 20, 2023 0
पुणे : रविवारी पुण्यामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका 24 वर्षाच्या तरुणीने नवले पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न…

तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरण : शीजान खानला 69 दिवसांनंतर जामीन मंजूर; म्हणाला, “मला तिची आठवण येते, जर ती जिवंत असती तर

Posted by - March 6, 2023 0
अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तब्बल 2 महिने तुरुंगात राहिल्यानंतर शीजान खानला जामीन मिळाला आहे. आता त्याने तुनिषा…
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - February 12, 2024 0
पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra…
nanded

उष्मघातामुळे 28 वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नांदेडमधील घटना

Posted by - May 14, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) उष्मघातामुळे (Heatstroke) एका 28 वर्षीय युवा शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याला उष्मघात आणि त्यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *