पूजा खेडकर यांनी चक्क यूपीएससीला गंडवलं; नावात बदल करून दिली 11 वेळा परीक्षा

539 0

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी नाव बदलून तब्बल 11 वेळा यूपीएससी परीक्षा दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीएससी परीक्षेचे अटेम्प्ट संपल्यामुळे त्यांनी नावात आणि नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल करत पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पूजा खेडकर यांनी 2020 पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. तर 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत नावात बदल करून पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. यूपीएससीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत. त्यामुळे पूजा खेडकर यांनी चक्क यूपीएससीला गंडवल्याच समोर आले आहे. यावेळी त्यांनी वडिलांच्या स्पेलिंग मध्ये बदल करत डबल इ ऐवजी डी आय लावले. ओबीसी प्रवर्गासाठी असलेले 9 अटेम्प्ट संपल्यानंतर पूजा यांनी 2020 मध्ये केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच कॅटकडे याचिका करत बहुविकलांगत्वासाठी त्यांना यूपीएससीचे अटेम्प्ट वाढवून मिळावेत, एससी आणि एसटी विद्यार्थ्यांप्रमाणं अमर्यादित संधी देण्यात याव्यात अशी मागणी केली होती. पण कॅटने पूजा खेडकर यांची ही मागणी फेटाळली. मात्र त्यानंतरही त्यानी 2021 आणि 2022 मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. याच परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची आयएएस पदी निवड झाली आहे. नावात बदल करण्यासाठी मोठी प्रक्रिया करावी लागते. आणि प्रत्येक प्रमाणपत्र कागदपत्रावरील नाव बदलावे लागते. त्यामुळे त्यांनी ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे का ? याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहेत.

पूजा खेडकर यांचा हा नवीन प्रताप समोर आल्यामुळे आता त्यांच्या सर्व प्रमाणपत्रांची, कागदपत्रांची देखील तपासणी होण्याची शक्यता आहे. खोटे दीव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र यानंतर आता यूपीएससीची फसवणूक केल्यामुळे खेडकर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आयएएस पद धोक्यात आले आहे.

Share This News

Related Post

सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेला बिबट्या जेरबंद

Posted by - March 21, 2022 0
पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department…

दुर्दैवी ! मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलीसहित चौघींचा तलावात बुडून मृत्यू

Posted by - May 14, 2022 0
लातुर- कपडे धुण्यासाठी तलावावर गेलेल्या पाच महिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तुळशीराम तांडा इथे…

पॅराग्लायडींग हॉट बलून उड्डाणांना बंदी ; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Posted by - March 5, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 6 मार्च रोजी पुणे शहरात दौरा होणार आहे. त्या अनुषंगाने व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर…
Pune University

Pune University : पुणे विद्यापीठात संत ज्ञानेश्वर महाराजांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Posted by - December 11, 2023 0
पुणे : महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. (Pune University) लोकसेवेचे महान मंदिर संतांनी या महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया उभारण्याचे महत्त्वाचे…
Gadchiroli News

Gadchiroli News : अख्खं कुटुंब उद्ध्वस्त ! भीषण अपघातात महिलेसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 27, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *