धक्कादायक ! फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने केला इंजिनीयर महिलेवर बलात्कार

535 0

पोलीस कर्मचारी विक्रम फडतरे याने इंजिनीयर महिलेला फेसबुकद्वारे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पोलिसाने इंजिनीयर महिलेवर बलात्कार केला. तसेच तिचे नग्न फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.मोशी,अकुर्डी तसेच इतर वेगवेगळ्या ठिकाणी १५ सप्टेंबर २०२१ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी पीडित ३० वर्षीय महिलेने शुक्रवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.विक्रम गणपत फडतरे वय ३४, रा. भिलारेवस्ती, पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.पीडितेशी मैत्री वाढवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, इंजिनीयर महिलेचे नग्न फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीशी वारंवार मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध केले, असे फिर्यादीत नमूद आहे.विक्रम फडतरे हा पुणे शहर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेचा कर्मचारी आहे. विवाहित असलेली पीडित फिर्यादी महिला इंजिनिअर असून एका खाजगी कंपनीत नोकरीलाअसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share This News

Related Post

Uddhav Thackeray

Shivsena MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांचा सगळ्यात मोठा निर्णय ! उद्धव ठाकरेंना बसले 3 धक्के

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shivsena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर…

मविआच्या समन्वय समितीची आज बैठक, महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावर होणार चर्चा ?

Posted by - January 27, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार असून या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांचे प्रमुख नेते…
election-voting

ईव्हीएममध्ये कॅमेरा?… बोटाला शाईही नाही?… कधीपासून होणार बदल…

Posted by - May 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे.…
Surendra Agrawal

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Posted by - May 25, 2024 0
पुणे : पुण्यातील हिट अँड रन प्रकरण सध्या (Pune Porsche Accident) संपूर्ण राज्यात गाजताना दिसत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *