हडपसर ते वीर गाव पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन

278 0

पुणे- हडपसर ते वीर गाव दरम्यान पीएमपीएमएलच्या नवीन बसमार्गाचे उदघाटन मंगळवारी (दि. १) करण्यात आले. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या प्रांगणात या बससेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ, सचिव अभिजीत धुमाळ, खजिनदार अमोल धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, सरपंच माऊली वचकल, पीएमपीएमएलचे हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर मोहन दडस, पुणे म्युनिसिपल कार्पोरेशन बँकेचे संचालक सुनील पोमण, महादेव पोमण, संजय पवार उपस्थित होते.

फुलांची आकर्षक सजावट केलेल्या पीएमपीएमएलच्या बसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वीर गाव ते सासवड दरम्यान फटाके वाजवून व ढोलताशांच्या गजरात बससेवेचे स्वागत करण्यात आले.

यावेळी दत्तात्रय झेंडे म्हणाले, ” सध्या या बसमार्गावर ३ बसेसद्वारे बससेवा उपलब्ध आहे. सासवडहून साधारणपणे दर ५० मिनिटांनी बससेवा उपलब्ध असेल. हडपसर ते वीर १२ खेपा व सासवड ते वीर १६ खेपा होणार आहेत. या परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांच्यासह श्रीनाथ म्हस्कोबा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चांगली सोय होणार आहे. प्रवाशी प्रतिसाद व उत्पन्न वाढल्यास या मार्गावर आणखी बसेस वाढविण्यात येतील. जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा”

सदरची बस सेवा सुरू झाल्यामुळे वीर, परिंचे, पांगारे, पिंपळे पोमणनगर, यादववाडी तसेच वीर ते सासवड दरम्यान असणाऱ्या गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून आम्हाला या बस सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.

Share This News

Related Post

Pune Metro

Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता

Posted by - March 11, 2024 0
पुणे : राज्य मंत्रिमंडळाने आज (11 मार्च), पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-१ मधील वनाज ते रामवाडी या मार्गिकेची विस्तारीत…
Govinda

Govinda : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Posted by - March 28, 2024 0
मुंबई : 90 च्या दशकातील सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते गोविंदा (Govinda) यांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गेल्या…

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई ; 324 किलो भेसळयुक्त गूळ जप्त

Posted by - September 29, 2022 0
पुणे : अन्न व औषध प्रशासनाने काल (बुधवारी) दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील मे. महाराज गूळ उद्योग उत्पादकाच्या गुऱ्हाळ घरावर छापा…

अभिमानास्पद! ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची धुरा आता भारतीय व्यक्तीच्या हाती

Posted by - May 2, 2023 0
Edited by: Bageshree Parnerkar ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केलं, देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटल, देशातील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *