पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश

376 0

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुणे शहर व जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पुणे येत आहेत. मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच पुणे महापालिकेत बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

व्हीव्हीआयपी यांच्या दौऱ्यानिमित्त सुरक्षिततेसाठी पुणे शहर व जिल्ह्यात ५ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ६ मार्चच्या मध्यरात्री १२ वा. पर्यंत पॅराग्लायडींग, हॉट बलून इत्यादी उड्डाणांना निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. आदेशाचे उल्लघंन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार दंडनियम कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

#BJP : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची भाजपची उमेदवारी हेमंत रसाने यांना जाहीर !

Posted by - February 4, 2023 0
पुणे : पुण्यातील कसबा मतदार संघाची भाजपची उमेदवारी आज जाहीर झाली असून, कसबा पोटनिवडणुकीसाठी पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले…

अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा

Posted by - April 20, 2022 0
मुंबई – मराठा समाजाबद्दल जातीय द्वेष निर्माण केल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा कोल्हापूर पोलिसांना ताबा मिळालेला आहे.…

उस्मानाबाद येथे पोलिसांवर हल्ला तर शेगाव पोलीस ठाण्यावर जमावाचा हल्लाबोल

Posted by - February 7, 2022 0
उस्मानाबाद- पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच आता पोलिसांवर गावगुंडांनी हल्ला केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत.…

कोण आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास

Posted by - June 24, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 21 जून रोजी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रपतिपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या…
Sandip Karnik

Police Officer Transfer : संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त

Posted by - November 21, 2023 0
पुणे : राज्य गृह विभागाने आज काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *