ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक मॅच अंतिम म्हणूनच खेळा

214 0

पुणे, प्रतिनिधी – ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चा (MPL) २ रा सीझन २ जूनपासून सुरू होत असून ‘एमपीएल’मध्ये सहभागी झालेल्या पुनीत बालन यांच्या ‘कोल्हापूर टस्कर्स’च्या संघाच्या जर्सीचे संघ मालक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ‘‘‘एमपीएल’मध्ये यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मॅच ही अंतिम मॅच असल्याचे समजून खेळा,’’ अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यात जिद्द निर्माण केली.

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून राज्यात भव्य स्वरुपात ‘महाराष्ट्र प्रिमीअर लीग’चे (MPL) आयोजन करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील अनेक गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी मिळत आहे. यंदा ‘एमपीएल’चा दुसरा हंगाम सुरु होत असून यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांचा ‘कोल्हापूर टस्कर्स’ हा संघही अनुभवी खेळाडू केदार जाधव याच्या नेतृत्त्वाखाली या स्पर्धेत सहभागी झाला आहे. या संघासाठीच्या जर्सीचे आज अनावरण करण्यात आले. यावेळी संघमालक पुनीत बालन यांनी उपकर्णधार म्हणून श्रीकांत मुंडे याच्या नावाची घोषणा केली.

खेळाडूंना शुभेच्छा देताना ते म्हणाले, ‘‘या सीझनमधील प्रत्येक मॅच खेळताना ती अंतिमच आहे, असे समजून प्रत्येकाने खेळले पाहिजे. त्यासाठी शक्य असेल तितकी जास्त घ्या. मेहनत आणि एकाग्रता या बळावरच तुम्ही तुमचे उद्दीष्ट साध्य साधू शकाल’’.

यावेळी कर्णधार केदार जाधव म्हणाले, ‘‘यंदाच्या मॅचेससाठी आमची खूप चांगली तयारी झाली आहे. त्यासाठी प्रत्येक खेळाडूने चांगले कष्ट घेतले आहे. त्यामुळे यंदा आम्हीच जिंकू, असा आमचा आत्मविश्वास आहे. यासाठी प्रत्येक खेळाडूने कसून सराव केला आहे. त्यामुळे आगामी महाराष्ट्र प्रिमीअर लीगमधील सर्वोत्तम संघ म्हणून आम्हीच असू’’.

‘‘कोल्हापूर टस्कर्स’ने गतवर्षीच्या हंगामात चांगली खेळी केली, परंतु अंतिम यश मात्र मिळू शकले नाही. यंदा आमच्या संघामध्ये सर्वच खेळाडू हे प्रतिकूल परिस्थितीतही आपली गुणवत्ता सिद्ध करु शकतील, असे आहेत. त्यामुळे यंदा आमच्यासाठी यश दूर नाही.’’

Share This News

Related Post

Bhide Wada Smarak

Bhide Wada Smarak : अखेर ! ‘भिडेवाडा स्मारका’चा प्रश्न सुटला; सुप्रीम कोर्टातील खटला पुणे महापालिकेनं जिंकला

Posted by - October 16, 2023 0
पुणे : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यानं मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु केली. त्या भिडेवाड्याच्या (Bhide…
Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ

Posted by - April 1, 2024 0
पुणे : पुणे शहरातील कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणातील 15 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाने पुणे पोलिसांना 30…
Pune News

Pune News : आप्पा रेणूसे मित्रपरिवार आयोजित “आरोग्य साथीचे” अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते शानदार प्रकाशन

Posted by - March 11, 2024 0
पुणे : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत,, ढोल ताशांच्या गजरात आणि प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आरोग्यसाथी या पुस्तकाचे शानदार…

संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ रामचंद्र देखणे यांचं निधन

Posted by - September 26, 2022 0
पुणे: संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 67…

पुणेकरांनो , तयारीत राहा ! येत्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाका आणखी वाढणार

Posted by - February 24, 2023 0
महाराष्ट्र : अजून मार्च महिना सुरूही झाला नसला तरी तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. आता आगामी पाच दिवस वातावरणातील उष्णता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *