Parth Pawar

Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

346 0

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी पुण्यात कुख्यात गुंड गजा मारणेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चाना उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. या भेटीच्यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीदरम्यान गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे देखील उपस्थित होत्या.

कोण आहे गजा मारणे?
गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याचा जन्म मुळशी तालुक्यातील गावात झाला आहे. शास्त्रीनगरमध्ये राहण्यासाठी आल्यानंतर तो गुन्हेगारीकडे वळला होता. कोथरुड आणि पुणे शहरात मारणे टोळीची दहशत आहे. घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यातील वर्चस्वाचा वाद सर्वश्रुत आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे हत्या प्रकरणी गजा मारणेला अटक झाली होती. या प्रकरणी तो 3 वर्षं येरवडा जेलमध्ये होता. गजा मारणेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दहशत माजविणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

गजा मारणेची पत्नी जयश्री या राजकारणात असून त्या मनसेच्या नगरसेविका होत्या. पार्थ पवारांनी गजा मारणे आणि जयश्री यांची भेट घेतल्याचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीमुळे कोथरुडमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Hall Ticket : फी भरली नाही म्हणून हॉल तिकीट अडवू नका; बालहक्क संरक्षण आयोगाकडून शिक्षण आयुक्तांना सूचना

Maratha Reservation : पुणे पोलिसांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या पदयात्रेचा मार्ग बदलला

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

pune-police

पुण्यातील नामांकित हॉटेल्सवर पोलिसांनी का केली कारवाई ? वाचा काय आहे प्रकरण..

Posted by - May 15, 2022 0
  पुण्यातील उच्चभ्रू भागतील हॉटेल्स आणि बार्सवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच, हॉटेल चालकांवर खटले देखील दाखल करण्यात आले आहे.…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची संख्या ५ लाख होणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Posted by - September 13, 2022 0
मुंबई : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय…
Aapa Renuse Mitra Pariwar

देशाला संविधान देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठे गुरु- डॉ. जब्बार पटेल

Posted by - July 8, 2023 0
पुणे : गुरुपौर्णिमेला तुमच्या गुरुला वंदन करा, परंतु या दिवशी भारतीय संविधानाची आठवण ठेवली पाहिजे कारण देशाला संविधान देणारे डॉ.…
Movie

अभिनेत्याचा संघर्ष सांगणाऱ्या ‘Cue Kya Tha’ ची Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

Posted by - September 9, 2023 0
पुणे : जागतिक चित्रपट सृष्टीचे ज्या महोत्सवाकडे डोळे लागलेले असतात त्या IFFSA Toronto आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘Cue Kya Tha’ या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *