jitendra shinde

Pune News : कोपर्डी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात आत्महत्या

523 0

पुणे : अहमदनगरच्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे याने पुण्यातील (Pune News) येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज पहाटेच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पहाटेच्या सुमारास पोलीस गस्तीसाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. अवघ्या महाराष्ट्राला हादरावून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी पप्पू शिंदे हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काय आहे कोपर्डी हत्याप्रकरण?
13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील तीनही आरोपींना 29 नोव्हेंबर 2017 ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. यासाठी एका विशेष फास्ट – ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली होती.

Share This News

Related Post

चोरांचा राजा ‘चोर राजा’…कसा सापडला पोलिसांच्या जाळ्यात ? पाहा TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Posted by - September 12, 2022 0
पुणे : एक-दोन नव्हे तर तब्बल 100 हून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात अट्टल घरफोड्या राजेश पपुल ऊर्फ ‘चोर राजा’च्या…
EVM

EVM : ईव्हीएम मशीन चोरीला; पुण्यात ‘या’ ठिकाणी गुन्हा दाखल

Posted by - February 7, 2024 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये जनजागृतीसाठी ठेवलेल्या ईव्हीएम (EVM) मशीनची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात…
Sikandar Shaikh

Sikandar Shaikh : ऑलंम्पिकमध्ये कुस्तीत सुवर्ण पदक जिकण्यांचे स्वप्न : सिंकदर शेख

Posted by - November 23, 2023 0
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती जिकल्यानंतर आता मला (Sikandar Shaikh) हिंद केसरी व्हायचे आहे. पण त्यापुढे जाऊन मला ऑलम्पिक स्पर्धेत…

पुणे महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील हरकती सूचनांची सुनावणी (व्हिडिओ)

Posted by - February 24, 2022 0
पुणे- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यावरील सुनावणीला सुरुवात झाली असून पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे…

राज्य सरकारच्या ‘या’ एका निर्णयामुळे पुणे महानगरपलिकेचे सुमारे दीड कोटी पाण्यात

Posted by - August 7, 2022 0
पुणे: महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी यावर्षी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत सुमारे दीड कोटी रुपये खर्च झाला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *