गुरुपौर्णिमेनिमित्त पुण्यातील आश्रमात ओशो अनुयायांना प्रवेश नाकारला; अनुयायांचं आंदोलन

218 0

पुणे: गुरुपौर्णिमेनिमित्त समाधीच्या दर्शनासाठी देशातील विविध ठिकाणांहून आलेल्या ओशो अनुयायांना आश्रमात प्रवेश करण्यास मनाई केल्याबद्दल पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आश्रमाबाहेर बुधवारी आंदोलन करण्यात आलं. ओशोंचे विचार संपवण्याचं विदेशी लोकांचं षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

“ओशो यांचा जन्म व मृत्यू स्थळ तसेच समाधी भारतात आहे मात्र ओशोंची बौद्धिक संपदा, पुस्तके, ध्वनिफिती, दृकश्राव्य फिती, ट्रस्टची मालमत्ता या सर्वांचे मान्यता अधिकार पाश्चिमात्यांकडे आहेत. झुरीच येथे ओशो इंटरनॅशनलचं मुख्यालय नेण्यात आलं असून सगळ्या गोष्टींचा लाभही तिथंच जात आहे. ओशोंचे विचार लोकांपर्यंत पोचू न देता अनुयायांवरही अनेक बंधनं लादण्यात येत आहेत. ओशोंच्या बौद्धिक संपदेवर हक्क सांगत त्या साहित्यातून मिळणारा संपूर्ण पैसा पाश्चिमात्यांकडेच जातोय. भारतीय ओशो आश्रमांना विशेषतः पुण्यातील आश्रमास त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही. उलट ते येथील व्यवस्थापनावरही आपलं वर्चस्व दाखवत आहेत. हा तर आश्रमाच्या मालमत्ता विकण्याचा प्रयत्न असून हे सर्व ओशोंचे विचार संपवण्याचं षडयंत्र आहे,” असा आरोप ओशो अनुयायांच्या वतीनं ओशो इंटरनॅशनल फाउंडेशनचे माजी विश्वस्त तसेच ‘ओशो वर्ल्ड’ पत्रिकेचे संपादक स्वामी चैतन्य कीर्ती यांनी केला. या पत्रकार परिषदेस स्वामी चैतन्य कीर्ती यांच्यासह पटकथाकार व ओशो अनुयायी कमलेश पांडे, याचिकाकर्ते व माजी विश्वस्त स्वामी प्रेमगीतजी अर्थात योगेश ठक्कर, स्वामी मोक्षजी, स्वामी चेतनारूपजी आदी अनुयायी उपस्थित होते.

माळा घालू नयेत या बंधनाचा आग्रह धरत आज माळधारक अनुयायींना समाधीचं दर्शन घेऊ देण्यात आलं नाही. दर्शन घ्यायचं असेल तर माळ काढावी लागेल, अशी सक्ती करण्यात आल्याचंही अनुयायींनी सांगितलं. आत प्रवेश नाकारल्यानं आश्रमाच्या प्रवेशद्वाराबाहेर अनुयायांनी भर पावसात चार तास आंदोलन केलं.

आधीच ओशो आश्रमाची जागा विकण्यावरून वाद सुरू असताना ओशोंची माळ न घालण्यासाठी अनुयायांवर घालण्यात आलेली बंधनं, ओशो साहित्याचे अधिकार आदी विषय देखील आता चव्हाट्यावर आले आहेत.

Share This News

Related Post

पुण्यातील कोयता गँगविरोधात खासदार अमोल कोल्हे मैदानात; थेट गृहमंत्र्यांना लिहलं पत्र

Posted by - December 14, 2022 0
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील हडपसर परिसरातील कोयता गॅंग सक्रिय होत असून या गँगने परिसरात दहशत निर्माण केली आहे. या गँग…

पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास राज्य मंत्रीमंडळाची मान्यता

Posted by - April 28, 2022 0
पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता…

आज महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा दिवस ; शिंदे गटाच्या 16 आमदारांचे भवितव्य ठरणार

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे. ही सुनावणी महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची…

Pune Crime : फंडात पैसे गुंतवताय ? सावधान…! कोथरूडमध्ये महिलांची लाखो रुपयांची फसवणूक

Posted by - July 25, 2022 0
पुणे : अज्ञान हे अनेक प्रकारच्या फसवणूक आणि गुन्ह्यांना सहज घडवून आणण्यासाठी सर्वात मोठा मार्ग आहे. अर्थात केवळ बँकेतील व्यवहार…
Arrest

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Posted by - December 15, 2023 0
पुणे : पुणे एटीएस (Pune News) पथकाने जिल्ह्यातील नारायणगाव या ठिकाणी एक मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी सकाळी नारायणगावात एटीएसच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *