District Legal Services Authority : 3 दिवसीय आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप शिबीराचे आयोजन

193 0

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि डिवाईन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुणे संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आधार कार्ड आणि शिधापत्रिका वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

परोपकार मित्र मंडळ, पांडव नगर चाळ नंबर पाच, वडारवाडी, पुणे येथे आयोजित या शिबिराचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी व आधार नोडल अधिकारी रोहिणी आखाडे फडतरे, अन्नधान्य वितरण अधिकारी सुरेखा माने, तहसीलदार तथा सहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी अपर्णा तांबोळी, डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे संकेत शहा आदी उपस्थित होते.

या शिबिरात नागरिकांना नवीन आधार नोंदणी व दुरुस्ती, नवीन शिधापत्रिका काढणे, नावे कमी व जास्त करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या शिबिरात 400 हून अधिक नवीन आधार कार्ड, 230 दुरुस्ती, 80 पेक्षा जास्त शिधापत्रिका दुरुस्ती आणि 150 नवीन अर्ज प्राप्त झाले.

Share This News

Related Post

पुणे जिल्ह्यातील भुकुम गावाची धुरा भाऊ-बहिणीच्या खांद्यावर

Posted by - April 23, 2023 0
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. मुळशीतील भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा कारभार आता बहीण-भाऊ…

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची आकर्षक पुष्पसजावट

Posted by - June 3, 2022 0
फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास आणि गाभा-यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान गणरायाचे विलोभनीय रुप शेषात्मज गणेश जयंतीच्या…

महत्वाची बातमी ! सिंहगड घाटामध्ये इ बसला पुन्हा अपघात, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

Posted by - May 13, 2022 0
पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा एकदा इ बसचा अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटून बस कठड्याला धडकली. सुदैवाने कठडा मजबूत…

पुणे : श्री शारदा सहकारी बँकेचे कॉसमॉस बँकेमध्ये विलीनीकरण

Posted by - November 1, 2022 0
पुणे : रिझर्व बँकेने मार्च 2021 मध्ये सहकारी बँकांच्या विलीनीकरणाबाबत परिपत्रक काढले होते त्यानुसार सहकार क्षेत्रातील देशातील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *