Ambadas Danve

Ambadas Danve : ‘तेव्हा तर म्हटले होते शरद पवार गुरू…’; दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला

439 0

पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी मोदींवर निशाण साधला आहे. बारामतीत जाऊन मोदींनी स्वत: शरद पवार माझे गुरू आहेत, आणि त्यांचं बोट धरून पुढे जातो असं म्हटले होते, असा टोला दानवे यांच्याकडून यावेळी लगावण्यात आला.

नेमके काय म्हणाले दानवे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना दानवे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बारामतीत जाऊन मोदींनी स्वत: शरद पवार माझे गुरू आहेत, आणि त्यांचे बोट धरून पुढे जातो असं म्हटले होते. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता त्यांनाच सत्तेत घेतलं असं दानवे यांनी म्हटलं आहे.

यावेळी अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणावरदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हा जनतेच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. जेव्हा हे आरक्षण कोर्टात गेल तेव्हा हेच फडणवीस म्हणाले होते की, आमचं सरकर येऊद्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ देऊ. आता केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर समाजाला आरक्षण मिळेल असं दानवे यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

खास तुमच्या माहितीसाठी: असा साजरा झाला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन

Posted by - January 26, 2023 0
आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनात रंगला आहे. याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश…

संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Posted by - March 12, 2022 0
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र…

शिक्षक आणि पदवीधर निवडणूक जाहीर; ‘ या’ दिवशी होणार मतदान

Posted by - December 30, 2022 0
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक…

गौरवास्पद ! न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याच्या नावाने अमेरिकेत पुरस्कार

Posted by - May 24, 2022 0
पुणे- स्वातंत्र्यपूर्व काळापासून राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम व सुजाण नागरिक घडविण्यासाठी कार्यरत असलेल्या टिळक रस्त्यावरील न्यू…

“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Posted by - October 8, 2022 0
नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *