Pune News

गणेशजयंती निमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

318 0

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून गणेश जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (दि. १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी केले आहे.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ परिसरात हे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. मंगळवारी सकाळी ८ ते ९ दरम्यान भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ९ ते १२ या वेळेत गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वा. ले. जनरल. डी. बी. शेकटकर यांच्या हस्ते बाप्पाची महाआरती करण्यात येणार आहे. दु. १२.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान भजन सेवा असणार आहे. सायंकाळी ४ ते ५.३० वाजता बी. व्ही. आय. पुणे यांच्यातर्फे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट परिसरात अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ६ ते ७.४५ वाजण्याच्या सुमारास श्रींचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता गिरनार शक्तीपीठाचे पिठाधीश महेशगिरी बापू महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. रात्री ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान शंकर महाराज भजनी मंडळ यांच्यावतीने भजन संध्या कार्यक्रम होणार असल्याची माहिती उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी दिली.

‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असून पुण्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं माझं आवाहन आहे.’’
पुनीत बालन
उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट

Share This News

Related Post

अखेर शिंदे आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Posted by - October 6, 2022 0
जुन्नर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकिय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा…
Pune News

Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; विद्यापीठ चौकात आजपासून होणार वाहतूक मार्गांत बदल

Posted by - November 10, 2023 0
पुणे : आचार्य आनंद ऋषी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) मेट्रोसाठीच्या उड्डाणपुलाचे काम चौकात सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठ…

Pune Porsche Car Accident : पुणे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; ‘ते’ CCTV फुटेज लागले पोलिसांच्या हाती

Posted by - May 26, 2024 0
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात गेल्या रविवारी भीषण अपघात (Pune Porsche Car Accident) घडला होता. एका मद्यधुंद अल्पवयीन चालकानं दुचाकीवरून…

VIDEO : ‘ बापूजी को रिहा करो ‘ घोषणा फलकांसह आसाराम बापूच्या 5 हजार भक्तांचा पुण्यात मूक मोर्चा

Posted by - August 30, 2022 0
पुणे : संत श्री आसारामबापू यांच्या अटकेला 30 ऑगस्टला 9 वर्ष होऊनही जामीन, पॅरोल न मिळाल्याने तो मिळावा, फास्ट ट्रॅक…
Pune News

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Posted by - March 15, 2024 0
कुरुंदवाड : पुणे येथील इंद्रायणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *