Dagdusheth Ganpati

गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतींची पुष्पसजावट

418 0

पुणे : गणरायाचा पाताळातील गणेश जन्म साजरा करताना दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati) मंदिरात फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये गणरायाचे विलोभनीय रुप विराजमान झाले. फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरावर केलेली आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यासह प्रवेशद्वारावर शेषनागाच्या विविधरंगी भव्य फुलांच्या भव्य प्रतिकृती साकारुन सजावट करण्यात आली. याच दिवशी श्री गणेशाचा पाताळातील गणेश जयंती (Ganesh Jayanti) म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. गणेश जयंतीनिमित्त मंदिरात ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता गायक ऋषिकेश रानडे व सहकारी यांनी स्वराभिषेकातून गणरायाचरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात गणेश याग, सहस्त्रावर्तने असे धार्मिक विधी देखील पार पडले.

भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून एक बालक जन्माला आले. त्याच्याकडे पाहिल्यानंतर भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. परिणामी आपल्या नव्या अपत्याला त्यांनी मायाकर असे नाव दिले. अनेकानेक वरदान देऊन त्याला परिपुष्ट केले. पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने आपल्या अतुलनीय वरदानांच्या भरवशावर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकले. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

श्रीशेष ध्यान करत असतांना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असे पण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट मंदिरामध्ये करण्यात आली होती.

Share This News

Related Post

अभाविपचं  S S Professional institute येथे टाळा ठोको आंदोलन

Posted by - March 5, 2022 0
एस एस प्रोफेशनल इन्स्टिट्यूट वर्षभरापासून विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे संपूर्ण शुल्क घेऊन सुद्धा दुसऱ्या…

दहावी (SSC) बारावीचा (HSC ) निकाल उशिरा लागण्याची शक्यता ? शिक्षकांचा मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार

Posted by - April 23, 2022 0
सरकारने 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी यासाठी हा बहिष्कार टाकण्यात आला आहे.विनाअनुदानित शाळांच्या महाराष्ट्र बोर्डाच्या अनेक शिक्षकांनी मूल्यांकन…

Patthe Bapurao Award : राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना जाहीर

Posted by - November 28, 2023 0
पुणे : लोककला क्षेत्रासाठी योगदान देणार्या व्यक्तींना शाहीर पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार (Patthe Bapurao Award) देण्यात येतात. यंदाचे…

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागील सूत्रधाराबाबत मोठी माहिती आली समोर

Posted by - March 5, 2023 0
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉक करताना क्रिकेट बॅट आणि स्टंपसह सशस्त्र मुखवटाधारी व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणी…

#HEALTH WEALTH : ‘या’ चुकीच्या सवयींमुळे तुम्ही लहान वयातच दिसू लागता वृद्ध; तुम्हालाही आहेत का या सवयी ?

Posted by - March 2, 2023 0
#HEALTH WEALTH : आधुनिक काळात लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय लागली आहे. याचा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *