पुणेकरांना मिळकतकराच्या हजारो रुपयांच्या थकबाकीच्या नोटीस ; अन्यायपूर्ण कार्यवाहीचा आदेश निलंबित करा – संदीप खर्डेकर

230 0

पुणे : पुणे महानगरपालिकेने मुख्य सभेने पारित केलेल्या ठराव क्रमांक 5, दिनांक ( 3-4-1970 ) च्या अनुषंगाने करपात्र रक्कम ठरविताना 10% ऐवजी 15% सूट द्यावी आणि घरमालक स्वतः रहात असलेल्या जागेचे भाडे वाजवी भाड्यापेक्षा 60% इतके धरावे असा निर्णय घेतला होता. स्वभाविकपणे या ठरावाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांनी त्यानुसार कार्यवाही केली होती. मात्र लोकलेखा समितीने या सवलतीस आक्षेप घेतला आणि महालेखापाल कार्यालयाने या सवलती रद्द करून 2010-11 पासून ( पूर्वलक्षी प्रभावाने ) कर वसुली करण्याची शिफारस केली.

त्यास अनुसरून राज्य सरकारने 28-05-2019 रोजी महालेखापालांच्या सूचनेनुसार 1970 सालचा ठराव विखंडीत करण्याबाबत आणि पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 2010-11 पासून सवलती रद्द करून कर वसुलीचे आदेश दिले.हे अन्यायकारक असल्याने पुणे मनपातील सत्ताधारी भाजपाने हा आदेश रद्द करण्याबाबतचा ठराव पारीत केला. मात्र राज्य शासनाने 17 सप्टेंबर 2021 रोजी मनपाचा दिनांक 28-08-2019 चा ठराव क्रमांक 320 निलंबित केला.

यानंतर गेल्या काही दिवसात पुणेकरांना धडाधड थकबाकीचे संदेश आणि नोटीस मिळाल्या आहेत. यापैकी बहुतांश पुणेकरांनी आपल्या मिळकतीचे 2022/2023 चे कर 31 मे च्या आत भरले आहे. आता या शासन आदेशापासून अनभिज्ञ असलेल्या पुणेकरांना अचानकच मनपाच्या नोटीस मिळाल्या असून त्यांची कराची थकबाकी असल्याचे समजल्यावर हजारो पुणेकरांना धक्का बसला. 2010-11 पासून हजारो रुपयांच्या कराच्या थकबाकीच्या नोटीसा मिळाल्यामुळे पुणेकर हवालदिल झाले आहेत. तरी आपण या अन्यायपूर्ण कार्यवाहीचा आदेश निलंबित करावा व 3-4-1970 चा ठराव कायम ठेऊन पुणेकरांना दिलासा द्यावा अशी मागणी पुणे भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Share This News

Related Post

अजित पवार पुन्हा गायब, पुण्यातील कार्यक्रमाला दादांची अनुपस्थिती

Posted by - April 17, 2023 0
विरोधी पक्षनेते अजित पवार काही दिवसांपूर्वी अचानक १७ तास नॉट रिचेबल राहिले अन् आज पुन्हा एकदा दादा अचानक गायब झाल्यामुळे…
Pune News

Shiv Jayanti 2024 : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत होणार मोठा बदल; ‘हे’ रस्ते राहणार बंद

Posted by - February 18, 2024 0
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती (Shiv Jayanti 2024) सोमवारी साजरी करण्यात येणार आहे. ही…

#PUNE : खडकी, शिवाजीनगर, हडपसर रेल्वे स्थानकांवरून पर्यायी रेल्वे सेवा सुरु करणार : खासदार गिरीश बापट

Posted by - February 6, 2023 0
पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” आज सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी…

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना ‘हे’ महत्वाचे आदेश

Posted by - December 13, 2022 0
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेक केली होती. या प्रकरणानंतर…

‘जी-२०’च्या अभिरूप परिषदेतही राजीव गांधी ई -लर्निंग स्कुल अव्वल !

Posted by - January 10, 2023 0
पुणे : ‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुणे, महाराष्ट्र आणि देशाची क्षमता दाखविण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली असून सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *